भिवंडीत डायपरच्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही
भिवंडीच्या सरवली एमआयडीसी मध्ये डायपर बनवणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली. या आगीत तीन मजला इमारत पूर्ण जळाली आहे. सकाळी 3 वाजेच्या सुमारास आग लागली. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
अपघाताचे समजतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या आगीत तीन मजला इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सदाशिव हायजिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये आग लागली असून आधी पहिल्या मजल्यावर लागली नंतर आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली कंपनी मध्ये कागद, कपडा, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असून आगीचे लोट सर्वत्र पसरले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कंपनीत डायपर बनवले जातात.
मंगळवारी सकाळी 3 वाजता अचानक कंपनीत आग लागली असून आगीने एकाएकी रौद्र रूप धारण केले. कंपनीचे कर्मचारी वेळीच बाहेर पडले. या मुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही..
आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
Edited by – Priya Dixit