मजगाव शेतवडीतील रस्ते डांबरीकरण करण्याची मागणी

वार्ताहर /मजगाव मजगाव शेतवडीतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून पावसाळ्यापूर्वी खडीकरण करून डांबरीकरण करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षापूर्वीपासून शेतवडीतील सर्व रस्ते उखडून गेल्याने पहिल्याच पावसामुळे चिखलमय झालेले आहेत. त्यामुळे शेताकडे जाणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर शेतवडीतील रस्ते संपूर्ण डांबरीकरण झाले होते. परंतु त्यानंतर त्याकडे कृषी खात्याने व संबंधित अधिकाऱ्यांनी […]

मजगाव शेतवडीतील रस्ते डांबरीकरण करण्याची मागणी

वार्ताहर /मजगाव
मजगाव शेतवडीतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून पावसाळ्यापूर्वी खडीकरण करून डांबरीकरण करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षापूर्वीपासून शेतवडीतील सर्व रस्ते उखडून गेल्याने पहिल्याच पावसामुळे चिखलमय झालेले आहेत. त्यामुळे शेताकडे जाणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर शेतवडीतील रस्ते संपूर्ण डांबरीकरण झाले होते. परंतु त्यानंतर त्याकडे कृषी खात्याने व संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित शेतवडीतील सर्व रस्त्यांची पुन:श्च खडीकरण करून डांबरी रस्ते करून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.