उष्णतेमुळे नरेगा कामगाराचा मृत्यू?

उष्णतेमुळे नरेगा कामगाराचा मृत्यू?

प्रतिनिधी/ बेंगळूर
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून उष्णतेमुळे लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. दरम्यान, नरेगाअंतर्गत काम करत असताना अचानक खाली कोसळून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. उष्णतेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कलबुर्गी जिल्ह्याच्या आळंद तालुक्यातील दण्णूर येथील रहिवासी शरणप्पा समगार यांचा मृत्यू सनस्ट्रोकने झाला की हृदयविकाराच्या झटक्मयाने, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शरणप्पा याच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची अधिकारी वाट पाहत आहेत. या प्रकरणी कलबुर्गी जिल्ह्यातील नरोना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश पार झाले असून बागलकोट येथे 40.6 तर कलबुर्गी येथे 40.9 अंशांची नोंद झाली आहे.