पिंगुळीत आंब्याचे जीर्ण झाड कोसळून दुचाकींचे नुकसान

कुडाळ – कुडाळ – वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर पिंगुळी – म्हापसेकर तिठा येथे बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास पिंपळाला संलग्न असलेले आंब्याचे मोठे जीर्ण झाड रस्त्याशेजारील बंद असलेल्या उसाच्या रगाड्यावर कोसळून त्यात पाच ते दहा दुचाकी सापडून नुकसान झाले. हा रहदारीचा रस्ता व वर्दळीचे ठिकाण असूनही या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक टब विक्रेता […]

पिंगुळीत आंब्याचे जीर्ण झाड कोसळून दुचाकींचे नुकसान

कुडाळ –
कुडाळ – वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर पिंगुळी – म्हापसेकर तिठा येथे बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास पिंपळाला संलग्न असलेले आंब्याचे मोठे जीर्ण झाड रस्त्याशेजारील बंद असलेल्या उसाच्या रगाड्यावर कोसळून त्यात पाच ते दहा दुचाकी सापडून नुकसान झाले. हा रहदारीचा रस्ता व वर्दळीचे ठिकाण असूनही या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक टब विक्रेता परप्रांतीय तरुण व अन्य एक व्यक्ती यात सुदैवाने बचावली. या मार्गावरील वाहतूक सुमारे अडीज तास ठप्प होती.ग्रामस्थांच्या मदतीने सदर झाड बाजूला करण्यात आले मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून आज सकाळी पाऊस व वारा आला.यात सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले कुडाळ रस्त्यावर पिंगळी म्हापसेकर तिठा येथे आनंदवन समोर ही घटना घडली. स्थानिक लोकप्रतिनिधी , राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते , ग्रामपंचायत प्रशासन, पिंगुळी व्यापारी संघाचे पदाधिकारी ,तेथील व्यापारी व ग्रामस्थानी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. कुडाळ पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग ,महावितरणचे अधिकारी कर्मचारी तेथे दाखल झाले. ग्रामस्थांसह या सर्वांनी मदतकार्यात भाग घेतला.