लांब पल्ल्याच्या गाड्या आणि स्थानकांवरील खाण्याच्या स्टॉल्सवर IRCTCची नजर
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरील आणि रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरील खाण्या-पिण्याच्या वस्तूंची गुणवत्ता तपासण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीची पहिली तपासणी १४ जूनपासून सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेने (INDIAN RAILWAY) आणि आयआरसीटीसीने (IRCTC) यासाठी पुढाकार घेतला आहे. रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत त्यांच्याकडे खाद्यपदार्थांचा दर्जा आणि जास्त दर आकारल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेने आपल्या 60 पेक्षा जास्त गाड्यांमधील पॅन्ट्री कार आणि विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी 20 सदस्यांची टीम तयार केली आहे. यामध्ये राजधानी (Rajdhani), वंदे भारत (Vande bharat), शताब्दी (Shatabdi) आणि तेजस (Tejas) या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या मोहिमेदरम्यान, आम्ही प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता आणि प्रमाण तसेच पाण्यासाठी रेलनीरची उपलब्धता, पॅन्ट्री कार आणि ट्रेनच्या बाजूला तैनात असलेल्या विक्रेत्यांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या इतर अनिवार्य सेवा तपासत आहे.आत्तापर्यंत 101 रेल्वे गाड्यांच्या ऑनबोर्ड केटरिंग सेवा तपासल्या गेल्या आहेत. निष्कर्षांच्या आधारे अशा गोष्टी करणाऱ्या परवानाधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल,” असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.ते पुढे म्हणाले की, पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना धावत्या ट्रेनमध्ये सुरक्षितपणे काम करणे, विशेषत: आग लागण्याचा धोका आणि अशा घटना घडल्यास करावयाच्या उपाययोजना याविषयी देखील प्रशिक्षण देण्यात आले.एकूणच, रेल्वे निरीक्षक गाड्यांमधील आणि रेल्वे स्थानकांवरील सेवेतील कमतरतांवर लक्ष केद्रित करत आहे. याच्या मदतीने परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. हेही वाचा महाराष्ट्रात ‘या’ योजनेंतर्गत गरीब महिलांना दरमहा ‘इतके’ रुपये मिळणाररेल्वे प्रवास अधिक सोईस्कर करण्यासाठी पश्चिम रेल्वेची 2,206 कोटींची गुंतवणूक
Home महत्वाची बातमी लांब पल्ल्याच्या गाड्या आणि स्थानकांवरील खाण्याच्या स्टॉल्सवर IRCTCची नजर
लांब पल्ल्याच्या गाड्या आणि स्थानकांवरील खाण्याच्या स्टॉल्सवर IRCTCची नजर
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरील आणि रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरील खाण्या-पिण्याच्या वस्तूंची गुणवत्ता तपासण्यास सुरुवात केली आहे. या वर्षीची पहिली तपासणी १४ जूनपासून सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेने (INDIAN RAILWAY) आणि आयआरसीटीसीने (IRCTC) यासाठी पुढाकार घेतला आहे.
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत त्यांच्याकडे खाद्यपदार्थांचा दर्जा आणि जास्त दर आकारल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेने आपल्या 60 पेक्षा जास्त गाड्यांमधील पॅन्ट्री कार आणि विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी 20 सदस्यांची टीम तयार केली आहे. यामध्ये राजधानी (Rajdhani), वंदे भारत (Vande bharat), शताब्दी (Shatabdi) आणि तेजस (Tejas) या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या मोहिमेदरम्यान, आम्ही प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता आणि प्रमाण तसेच पाण्यासाठी रेलनीरची उपलब्धता, पॅन्ट्री कार आणि ट्रेनच्या बाजूला तैनात असलेल्या विक्रेत्यांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या इतर अनिवार्य सेवा तपासत आहे.
आत्तापर्यंत 101 रेल्वे गाड्यांच्या ऑनबोर्ड केटरिंग सेवा तपासल्या गेल्या आहेत. निष्कर्षांच्या आधारे अशा गोष्टी करणाऱ्या परवानाधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल,” असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना धावत्या ट्रेनमध्ये सुरक्षितपणे काम करणे, विशेषत: आग लागण्याचा धोका आणि अशा घटना घडल्यास करावयाच्या उपाययोजना याविषयी देखील प्रशिक्षण देण्यात आले.
एकूणच, रेल्वे निरीक्षक गाड्यांमधील आणि रेल्वे स्थानकांवरील सेवेतील कमतरतांवर लक्ष केद्रित करत आहे. याच्या मदतीने परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. हेही वाचा
महाराष्ट्रात ‘या’ योजनेंतर्गत गरीब महिलांना दरमहा ‘इतके’ रुपये मिळणार
रेल्वे प्रवास अधिक सोईस्कर करण्यासाठी पश्चिम रेल्वेची 2,206 कोटींची गुंतवणूक