दबंग दिल्लीचा विजय

वृत्तसंस्था/ हैद्राबाद 2024 च्या प्रो-कबड्डी लिग स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीने यु मुंबाचा 39-33 अशा 7 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात दबंग दिल्लीच्या आशु सिंगने आपल्या चढायावर 17 गुण मिळविले. या सामन्यात यु मुंबातर्फे गुमानसिंगने चढायावर 13 गुण पटकाविले. या सामन्यातील विजयामुळे दबंग दिल्लीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून यु मुंबा […]

दबंग दिल्लीचा विजय

वृत्तसंस्था/ हैद्राबाद
2024 च्या प्रो-कबड्डी लिग स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीने यु मुंबाचा 39-33 अशा 7 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात दबंग दिल्लीच्या आशु सिंगने आपल्या चढायावर 17 गुण मिळविले.
या सामन्यात यु मुंबातर्फे गुमानसिंगने चढायावर 13 गुण पटकाविले. या सामन्यातील विजयामुळे दबंग दिल्लीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून यु मुंबा संघ सातव्या स्थानावर आहे. या लढतीतील पूर्वार्धावेळी यु मुंबाने दिल्ली दबंगचे सर्व गडी बाद करुन अल्पशी आघाडी मिळविली होती.