अंगारकीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये गर्दी

अंगारकी संकष्टी श्रद्धा-भक्तिभावाने : विशेष पूजेचे आयोजन : दर्शनासाठी उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा  बेळगाव : शहर परिसरात अंगारकी संकष्टी श्रद्धेने व भक्तिभावाने साजरी झाली. संकष्टीमध्ये अंगारकी संकष्टी ही विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे शहर परिसरातील गणेश मंदिरांमध्ये मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. अनगोळ नाका येथील स्वयंभू गणेश मंदिर, टिळकवाडी महर्षि रोड येथील सिद्धिविनायक मंदिर, शहापूर कचेरी गल्ली येथील गणपती मंदिर, खडेबाजार शहापूर येथील सिद्धिविनायक […]

अंगारकीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये गर्दी

अंगारकी संकष्टी श्रद्धा-भक्तिभावाने : विशेष पूजेचे आयोजन : दर्शनासाठी उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा 
बेळगाव : शहर परिसरात अंगारकी संकष्टी श्रद्धेने व भक्तिभावाने साजरी झाली. संकष्टीमध्ये अंगारकी संकष्टी ही विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे शहर परिसरातील गणेश मंदिरांमध्ये मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. अनगोळ नाका येथील स्वयंभू गणेश मंदिर, टिळकवाडी महर्षि रोड येथील सिद्धिविनायक मंदिर, शहापूर कचेरी गल्ली येथील गणपती मंदिर, खडेबाजार शहापूर येथील सिद्धिविनायक व बाजारपेठ येथील गणेश मंदिर, चन्नम्मा सर्कलमधील गणपती मंदिर, हिंडलगा येथील गणेश मंदिर, सदाशिवनगर येथील हरिद्रा गणपती मंदिर, शाहूनगर येथील गणपती मंदिर यासह सर्वच ठिकाणच्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
अंगारकीनिमित्त सर्व गणेश मंदिरांमध्ये सकाळपासूनच विशेष पूजा करण्यात आली. गणेशमूर्तींना फुलांच्या आराशीने सजविण्यात आले. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी फुले, दुर्वा, श्रीफळ, हार, उदबत्ती यांचे स्टॉल्स लावले होते. वडगाव बाजार गल्ली येथील गणेश मंदिरमध्ये पुजारी युवराज भट्ट यांनी पहाटे 6 वा. गणेश मूर्तीसमोर मंत्रघोष केला. कुंकुमार्चन, जलाभिषेक, पंचाभिषेक व रुद्राभिषेक झाला. हार, फुले आणि फळांनी गणपतीची सजावट करण्यात आली. सर्वच मंदिरांमध्ये उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. प्रसाद वितरणाने अंगारकीची सांगता झाली.