डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांबाबत जनजागृती करा

मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना बेळगाव : शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुणियाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये जनजागृती करावी, याचबरोबर औषध फवारणी करण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाला व इतर विभागांना केली आहे. शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे पाण्याचा साठा करू नये, यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जागृती करावी. आपला परिसर स्वच्छ […]

डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांबाबत जनजागृती करा

मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुणियाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये जनजागृती करावी, याचबरोबर औषध फवारणी करण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाला व इतर विभागांना केली आहे. शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे पाण्याचा साठा करू नये, यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जागृती करावी. आपला परिसर स्वच्छ ठेवा असे मार्गदर्शन करा, कचरा निर्मूलन करून डासांचा प्रादूर्भाव रोखावा यासाठीही प्रत्येक प्रभागातील घरांमध्ये जाऊन सूचना करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. बेळगावसह संपूर्ण राज्यात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तेव्हा जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बुधवारपासून प्रभागांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. प्रभाग महसूल निरीक्षकांसह आरोग्य निरीक्षकांनीही लक्ष द्यावे, असे सांगून डेंग्यू व इतर साथीच्या आजारांना प्रतिबंध घाला, असे त्यांनी सांगितले.