कव्हर ड्राईव्ह-अमेरिकेत क्रिकेटचे पडघम वाजू लागलेत !

अखेर आयपीएलचा सतरावा हंगाम संपला. बघता बघता केकेआरने सनरायजर्स हैदराबादला अक्षरश: लोळवलं. या आयपीएलने मोठ्या प्रमाणात तमाम भारतीयांची करमणूक केली. यात बरेच मानापमानही झालेत. हार्दिक पंड्याच्या राजशाहीमुळे मुंबई इंडियन्समधील अस्वस्थता, दुसरीकडे विराट कोहली-सुनील गावसकर गुऊजी  यांच्यामधील वाग्युद्ध चांगलेच रंगले, नव्हे ते चवीने अनुभवले गेले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोटीच्या कोटी उ•ाणं थांबतील. परंतु या धामधुमीत […]

कव्हर ड्राईव्ह-अमेरिकेत क्रिकेटचे पडघम वाजू लागलेत !

अखेर आयपीएलचा सतरावा हंगाम संपला. बघता बघता केकेआरने सनरायजर्स हैदराबादला अक्षरश: लोळवलं. या आयपीएलने मोठ्या प्रमाणात तमाम भारतीयांची करमणूक केली. यात बरेच मानापमानही झालेत. हार्दिक पंड्याच्या राजशाहीमुळे मुंबई इंडियन्समधील अस्वस्थता, दुसरीकडे विराट कोहली-सुनील गावसकर गुऊजी  यांच्यामधील वाग्युद्ध चांगलेच रंगले, नव्हे ते चवीने अनुभवले गेले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोटीच्या कोटी उ•ाणं थांबतील. परंतु या धामधुमीत टी-20 वर्ल्ड कप विंडीज व अमेरिकेत जून महिन्यात होऊ घालतोय हे आपण विसरलो की काय? अशी शंका येऊ लागली. अन्न, वस्त्र, निवारा, क्रिकेट आणि क्रिकेटचे धावते समालोचन हा माझा श्वास असल्यामुळे मी याकडे कसा दुर्लक्षित करणार?. असो. ऑलिम्पिकमध्ये खोऱ्याने पदकांची लयलूट करणारा, आणि बेसबॉल प्रिय असणाऱ्या अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचे पडघम खऱ्या अर्थाने वाजू लागलेत. एव्हाना भारतीय संघ अमेरिकेत पोचलाही असेल. (भारतीय संघ दोन तुकडीत पोहोचणार आहे) ज्यावेळी 15 खेळाडूंची भारतीय संघाची घोषणा झाली, त्यावेळी थोडसं आश्चर्य वाटलं. रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, नटराजन या चार उदयोन्मुख खेळाडूंची निवड झाली नाही हे पाहून मी तर कमालीचा निराश झालो होतो. (रिंकू सिंग रिझर्व्ह यादीत आहे. त्याचे रिझर्व्ह यादीत नाव असणं म्हणजे मधुमेह झालेल्या ऊग्णाला ताटात साखर असल्याप्रमाणेच आहे.) आपण किती दिवस अनुभवी खेळाडूंच्या जीवावर जगणार आहोत?. भिऊ नकोस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे ते तरी किती दिवस म्हणतील म्हणा. असो.
2007 मधील टी-20 विश्वचषक आठवा. भारताकडून फार मोठ्या अपेक्षाही त्यावेळी नव्हत्या. त्या विश्वचषकात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दिग्गज त्रिकुटाने टी-20 फॉरमॅटपासून दूर राहणं पसंत केलं. त्यानंतर युवा महेंद्रसिंग धोनीवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली. आणि त्यानंतर काय घडलं ते सर्वश्रुत आहे. ऑस्ट्रेलियासारख्या संघाने अनुभवी स्टीव स्मिथला नारळ दिला. याचं अनुकरण किंवा यासारखे धारिष्ट्या आपण कधी दाखवणार? हा एक मोठा यक्षप्रश्न आहे. 2007 नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मागील काही टी-20 चषकात रोहित, विराट, बुमराह या अनुभवी खेळाडूंचे प्रयत्न अपुरे पडले हे आपण वारंवार पाहिले. एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅट यात जमीन आसमानाचा फरक. एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमध्ये अनुभव आपल्याला पैलतिरी नेऊन सोडतो. परंतु टी-20 फॉरमॅटमध्ये नवखे खेळाडू दादागिरी करत असताना दिसतात. नव्हे आम्हीच उदयान्मुख खेळाडू या फॉरमॅटचे बाप असल्याचे वारंवार ते ठणकावून सांगतात. (आयपीएलमध्ये हे दृश्य वारंवार बघायला मिळतं.) थोडक्यात भारतीय संघाच्या विजयाच्या यशोगाथेचे वर्णन करायचे झाले तर अजिंक्यपदाच्या विजयाचा घास मुखाशी येऊन तो दूर जातो. थोडक्यात काय प्रवासात सुंदर तऊणी बाजूला असून नसल्यासारखी आहे. अशीच परिस्थिती काहीशी भारतीय संघाची आहे. असो. कही खुशी कही गमची अनुभूती देणारा भारतीय संघ या विश्वचषकात काय पराक्रम करतो हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. टी-20 मधील विजेतेपदाच्या आनंदाच्या पाऊलखुणावरून वाटचाल करीत दीड तप लोटला. हेच आनंदाचे क्षण भारतीय संघाला परत पहावयाचे असतील किंबहुना त्या पाऊलखुणावरून पुन्हा चालायचे असेल तर मात्र भारतीय संघाला बरीच मेहनत घेऊन भरपूर घाम गाळावाच लागेल एवढं मात्र खरं.!
विजय बागायतकर