पांढरे रेशनकार्ड ‘आधार’ संलग्नसाठी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा

► प्रतिनिधी कोल्हापूर शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी तालुका तहसील कार्यालयातील पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान […]

पांढरे रेशनकार्ड ‘आधार’ संलग्नसाठी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा

► प्रतिनिधी
कोल्हापूर
शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी तालुका तहसील कार्यालयातील पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश केला आहे.