राजू शेट्टी यांच्यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न केले… पण शेट्टी निर्णय घेईपर्यंत वेळ निघून गेली होती- सतेज पाटील

राजू शेट्टी यांच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते. पण राजू शेट्टी यांना फक्त शिवसेनेचा पाठींबा घ्यायचा होता. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रावादी याच्यापासून दूर रहायचे होते. महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना चांगली ऑफर होती पण राजू शेट्टी यांनी निर्णय घेईपर्यत वेळ निघून गेली होती असं स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं. लोकसभा […]

राजू शेट्टी यांच्यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न केले… पण शेट्टी निर्णय घेईपर्यंत वेळ निघून गेली होती- सतेज पाटील

राजू शेट्टी यांच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते. पण राजू शेट्टी यांना फक्त शिवसेनेचा पाठींबा घ्यायचा होता. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रावादी याच्यापासून दूर रहायचे होते. महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना चांगली ऑफर होती पण राजू शेट्टी यांनी निर्णय घेईपर्यत वेळ निघून गेली होती असं स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं.
लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला मोठा धोका दिला असून त्यामुळेच आपला पराभव झाल्याचा जोरदार आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसापुर्वी केला होता. यावेळी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीने आपल्याला पाठींबा देण्याचं जाहीर केलं. निवडूण आल्यानंतर महाविकास आघाडीला पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते या नात्याने आमदार सतेज पाटील आणि जयंत पाटील यांनी ड्राफ्ट लिहून घेतला होता. पण एकीक़डे माझ्याशी बोलणी सुरू ठेवून त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळेच माझा पराभव झाल्याचं खळबळजनक विधान राजू शेट्टी यांनी केलं होतं.
यावर आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोल्हापूरात आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमध्ये यावेत यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न केले होते. हे त्यांच्या माणसांनाही माहीत आहे. सुरवातीला त्यांनी फक्त शिवसेनेचा पाठींबा पाहीजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नको ही भुमिका शेवटी बदल्यासाठी प्रयत्न केला पण तेव्हा वेळ निघून गेली होती.” असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीने कोणतीही फसवणूक केली नसल्याचं म्हटलं आहेत. तसेच शेवटच्या टप्प्यात मी त्यांच्याशी फोनवरून बोललो आणि त्यांना पटवून सांगितलं. पण त्याच वेळी वरिष्ठ पातळीवर अनेक गैरसमज झाले होते. राजू शेट्टी निर्णय घेईपर्यत वेळ निघून गेली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विश्वासघात झाला अस म्हणणं चुकीचं असल्याचा खुलासाही आमदार सतेज पाटील यांनी केला.