जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार
बेळगाव : बेंगळूरला बदली झालेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निरोप दिला. जिल्हा प्रशासनातर्फे सपत्नीक त्यांचा सत्कार केला.यावेळी नितेश पाटील म्हणाले, गेली अडीच वर्षे येथे केलेल्या सेवेचा आपल्याला आनंद आहे. यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे रजिस्ट्रार राजश्री जैनापूर, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री आदींची गौरव करणारी भाषणे झाली. यावेळी नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी विजयपुमार होनकरी, आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीणा यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी होते.
Home महत्वाची बातमी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार
बेळगाव : बेंगळूरला बदली झालेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निरोप दिला. जिल्हा प्रशासनातर्फे सपत्नीक त्यांचा सत्कार केला.यावेळी नितेश पाटील म्हणाले, गेली अडीच वर्षे येथे केलेल्या सेवेचा आपल्याला आनंद आहे. यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे रजिस्ट्रार राजश्री जैनापूर, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री आदींची गौरव करणारी भाषणे झाली. यावेळी नूतन जिल्हाधिकारी […]
