दहावीची विद्यार्थिनी पेपर लिहिताना बेशुद्ध
वैद्यकीय उपचारानंतर लिहिली उत्तरपत्रिका
बेळगाव : दहावीचा गणित विषयाचा पेपर देताना एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्याची घटना मंगळवारी शहरातील अंजुमन कॉलेज परीक्षा केंद्रावर घडली. केंद्र प्रमुख, तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या विद्यार्थिनीला वैद्यकीय उपचार दिल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्या विद्यार्थिनीने उर्वरित उत्तरपत्रिका काही वेळानंतर सोडविली. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास अंजुमन परीक्षा केंद्रात एका विद्यार्थिनीला अस्वस्थ वाटू लागल्याने ती बेशुद्ध पडली. ही बाब पर्यवेक्षक एस. एस. हादीमनी यांनी तात्काळ केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविली. गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ व सीआरसी आय. डी. हिरेमठ यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून रुग्णवाहिका मागवून घेतली. विद्यार्थिनीवर काही वेळातच उपचार सुरू झाल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. बरे वाटू लागल्यानंतर तिने गणित विषयाचा उर्वरित पेपर सोडविला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जि. पं. सीईओंची परीक्षा केंद्राला भेट
दहावी परीक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी मंगळवारी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी कॅम्प येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या परीक्षा केंद्राला भेट दिली. सीसीटीव्ही, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याविषयी माहिती घेतली. तसेच परीक्षेदरम्यान कोणतीही चूक होऊ नये, याची खबरदारी पर्यवेक्षक, केंद्र प्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना केल्या. यावेळी जिल्हाशिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे, गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांसह इतर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी दहावीची विद्यार्थिनी पेपर लिहिताना बेशुद्ध
दहावीची विद्यार्थिनी पेपर लिहिताना बेशुद्ध
वैद्यकीय उपचारानंतर लिहिली उत्तरपत्रिका बेळगाव : दहावीचा गणित विषयाचा पेपर देताना एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्याची घटना मंगळवारी शहरातील अंजुमन कॉलेज परीक्षा केंद्रावर घडली. केंद्र प्रमुख, तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या विद्यार्थिनीला वैद्यकीय उपचार दिल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्या विद्यार्थिनीने उर्वरित उत्तरपत्रिका काही वेळानंतर सोडविली. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास अंजुमन परीक्षा केंद्रात एका विद्यार्थिनीला अस्वस्थ […]