राजधानीत आजपासून कदंबच्या सिटी बसेस

पणजी : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत राजधानीच्या विविध भागात ई-बसेस चालविण्यासंबंधी सरकारने आखलेल्या योजनेची आज दि. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार पणजीसह ताळगाव, सांताक्रूझ, बांबोळी आदी भागात या बसेस चालविण्यात येणार आहेत. या ई-फ्लीटसाठी यापूर्वीच 161 बसथांबे अधिसूचित करण्यात आले आहेत. कदंब महामंडळाकडून या बसेस चालविण्यात येणार आहेत. या मार्गांवरील बस थांबे केवळ प्रवाशांना चढणे […]

राजधानीत आजपासून कदंबच्या सिटी बसेस

पणजी : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत राजधानीच्या विविध भागात ई-बसेस चालविण्यासंबंधी सरकारने आखलेल्या योजनेची आज दि. 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार पणजीसह ताळगाव, सांताक्रूझ, बांबोळी आदी भागात या बसेस चालविण्यात येणार आहेत. या ई-फ्लीटसाठी यापूर्वीच 161 बसथांबे अधिसूचित करण्यात आले आहेत. कदंब महामंडळाकडून या बसेस चालविण्यात येणार आहेत. या मार्गांवरील बस थांबे केवळ प्रवाशांना चढणे आणि उतरण्यासाठीच वापरण्यात येतील. दिव्यांग व्यक्तींसाठीही हे थांबे सुलभरित्या वापरणे शक्य होईल. या मार्गावर विविध प्रवासी क्षमतेच्या 60 बसेस चालविण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात किमान 44 बसेस धावणार आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.