पत्रादेवी येथे 42 लाखांची दारू जप्त

पत्रादेवी येथे 42 लाखांची दारू जप्त

निवडणुकीसाठी जात होती आंध्र प्रदेशमध्ये : पेडणे अबकारी कार्यालयाची धडक कारवाई,एसएसटी पथकाकडूनही 37 हजारांची दारू जप्त
पेडणे : पत्रादेवी येथे काल रविवारी 31 रोजी सकाळी पेडणे अबकारी कार्यालयाने राष्ट्रीय महामार्गावरील तपासणी नाक्मयावर केलेल्या कारवाईत आंध्र प्रदेशमध्ये निवडणुकीसाठी जाणाऱ्या कंटेनरसह 42 लाख ऊपयांची बेकायदेशीर दारू पकडली आहे. त्याचबरोबर अन्य एका कारवाईत एसएसटी पथकानेही 37 हजार रुपयांची दारू पकडली आहे. त्यामुळे पत्रादेवी येथे कालच्या एकाच दिवसात तब्बल 42 लाख 37 हजारांची दारू पकडली आहे. सध्याच्या निवडणूक काळात गोव्यातून मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर दारू अन्य राज्यांमध्ये नेली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेडणे अबकारी कार्यालयाचे अधिकारी जयेश बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बेकायदेशीर दारू दक्षिण गोव्यातून महाराष्ट्र राज्यात तसेच आंध्र प्रदेश येथे निवडणुकीसाठी नेण्यात येत होती. सदर कंटेनर तपासणीसाठी गेटवर थांबविण्यात आला, त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आले. ही तपासणी पेडणे अबकारी कार्यालयाचे अधिकारी राजेश नाईक,  अधिकारी जयेश बांदेकर, साहाय्य अधिकारी वासुदेव गावस, विशाल गावस, जितेंद्र गावस, लाडू गावकर, तुकाराम जगळे आणि सहकारी यांनी ही कारवाई केली. पत्रादेवी येथे तपासणी नाक्मयावर एनएल-1-एन-3868 या क्रमांकाचा कंटेनर तपासणीसाठी थांबविला असता, त्यात दारूच्या पेट्या आढळल्या. या कंटेनरमध्ये 1,250 व्हिस्कीच्या पेट्या होत्या. त्यांची किंमत 30 लाख ऊपये आहे, तर वाहनाची किंमत 12 लाख ऊपये मिळून एकूण मुद्देमालाची किंमत 42 लाख ऊपये आहे.
एसएसटी कारवाईत 37 हजारांची दारू जप्त
काल रविवारीच केलेल्या दुसऱ्या कारवाईत एस. एस. टी. म्हणजे बेकायदेशीर घटनांवर नजर ठेवणाऱ्या पथकाने उत्तर गोवा अतिरिक्त ताबा असलेले केदार नाईक व  पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली पत्रादेवी तपासणी नाक्मयावर एम. एच 46 – झेड – 9409 या क्रमांकाच्या कारमधून 230 लिटर एकूण 37,300 ऊपयांची दारू पकडली आहे. अॅडरीकल क्लासिक 750 मिली लीटर व्हिस्कीच्या 82 बाटल्या, रियल व्हॉडका 750 मिली लीटरच्या 27 बाटल्या, डॉक्टर ब्रँडी 750 मिली लीटरच्या 186 बाटल्या, मॅक डॉवेल प्लॅटीनमच्या 6 बाटल्या, मॅक डॉवेल नंबर 1 च्या 3 बाटल्या, सिग्नीचर  व्हिस्की 750 मी. मी. च्या 3 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की 750 मी. मी 10 बाटल्या जप्त केल्या आहेत. ही दाऊ 37 हजार ऊपये किमतीची असल्याची माहिती देण्यात आली. दारू आणि दारू नेण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. सदर दारू पेडणे अबकारी कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी दिली.