रस्ता निर्माण करून दिल्याबद्दल मंत्री हेब्बाळकर यांचे नागरिकांकडून आभार

बेळगाव : हिंडलगा, गणेशनगर येथील बंजारा कॉलनी येथील रहिवाशांसाठी रस्ता निर्माण करून दिल्याबद्दल रहिवाशांकडून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. सदर भागातील नागरिकांकडून रस्त्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मंत्री हेब्बाळकर यांनी नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत रस्ता निर्माण करून दिला आहे. यामुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विकासाला […]

रस्ता निर्माण करून दिल्याबद्दल मंत्री हेब्बाळकर यांचे नागरिकांकडून आभार

बेळगाव : हिंडलगा, गणेशनगर येथील बंजारा कॉलनी येथील रहिवाशांसाठी रस्ता निर्माण करून दिल्याबद्दल रहिवाशांकडून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. सदर भागातील नागरिकांकडून रस्त्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मंत्री हेब्बाळकर यांनी नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत रस्ता निर्माण करून दिला आहे. यामुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विकासाला चालना मिळाली असून विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे, असे सांगत नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी रफीक शेख, जॉन्सन, येसय्या जॉनदास, अनुश्रिया कोले, संगीता कुट्रे, मोबिना सनदी, अनिता शहापूरकर, सूर्यकांत दोशी, उत्तम जाधव, रफीक खान आदी उपस्थित होते.