चीन ने इंडोनेशियाच्या पराभव करत उबेरकप विजेतेपद पटकावले

चीनने रविवारी इंडोनेशियाच्या 3-0 असा पराभव करत 16व्यांदा उबेर कप विजेतेपद पटकावले. ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईने एकेरीच्या लढतीत ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा 21-7, 21-16असा पराभव करत चीनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

चीन ने इंडोनेशियाच्या पराभव करत उबेरकप विजेतेपद पटकावले

चीनने रविवारी इंडोनेशियाच्या 3-0 असा पराभव करत 16व्यांदा उबेर कप विजेतेपद पटकावले. 

ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेईने एकेरीच्या लढतीत ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगचा 21-7, 21-16असा पराभव करत चीनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

 

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चेन किंगचेन आणि जिया यिफान जोडीने दुहेरीच्या सामन्यात सिती फादिया सिल्वा रामधंती आणि रेबेका सुगियार्तो यांचा 21-11, 21-8  असा पराभव करून चीनला 2-0 ने आघाडीवर नेले.यानंतर दुसऱ्या एकेरीत इंडोनेशियातील किशोर एस्टर नुरुमी ट्रायने पहिला सेट 21-10 असा जिंकला, पण हि बिंगजियाओने पुनरागमन करत 21-15, 21-17 असा विजय मिळवला आणि विजेतेपदावर नाव कोरले.

 

इंडोनेशियाच्या युवा खेळाडूंसाठीही हा ऐतिहासिक दिवस होता, कारण त्यांनी 2008 नंतर प्रथमच संघाला अंतिम फेरीत नेले.इंडोनेशिया 2008 नंतर पहिला उबेर कप फायनल खेळत होता. पण चीन ने 16व्यांदा उबेर कप जिंकला.

Edited By- Priya Dixit   

 

Go to Source