इचलकरंजीच्या कौशल्या आजींकडून अडीच कोटी राम जप

इचलकरंजी प्रतिनिधी इचलकरंजी शहरामधील प्रतिष्ठित आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या सांगले परिवारातील कौशल्या आजी यांनी प्रभू श्रीराम चरणी सुमारे अडीच कोटी राम नामाचा जप अर्पण केल्या आहेत. गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेला राम नामाचा जप आजही अखंडपणे सुरूच आहे. या त्यांच्या प्रभू श्रीराम प्रति असलेली भक्ती आणि श्रद्धा परीसरात चर्चेचा विषय ठरला आहे. येथील मंगळवार पेठेतील […]

इचलकरंजीच्या कौशल्या आजींकडून अडीच कोटी राम जप

इचलकरंजी प्रतिनिधी
इचलकरंजी शहरामधील प्रतिष्ठित आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या सांगले परिवारातील कौशल्या आजी यांनी प्रभू श्रीराम चरणी सुमारे अडीच कोटी राम नामाचा जप अर्पण केल्या आहेत. गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेला राम नामाचा जप आजही अखंडपणे सुरूच आहे. या त्यांच्या प्रभू श्रीराम प्रति असलेली भक्ती आणि श्रद्धा परीसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
येथील मंगळवार पेठेतील सांगले परिवाराला प्रतिष्ठित आणि अध्यात्मिक वारसा लाभला आहे. याच परिवारातील ज्येष्ठ सदस्या कौशल्या केशव सांगले या २००७ पासून अखंडपणे राम नामाचा जप करत आहेत. त्यांना थोरल्या जाऊबाईंकडून श्रीराम जप लिखाणाची प्रेरणा मिळाली. छोटी मोठी घरातील कामे करत त्या राम नामाचा जप करत असतात. आज वयाच्या ८८ व्या वर्षीही हा जप अव्याहतपणे सुरू आहे. आजवर २ कोटी ४८ लाख ४७ हजार २०० इतकी जप संख्या झाली असून तब्बल ८५० वह्या जपाने भरल्या आहेत. कौशल्या आजी जप करताना एकरूप होऊन जातात. भक्तिरसात चिंब होवून जातात.
देव हा भक्तीचा भुकेला आहे, असे म्हणतात. त्रेता युगातील श्रीरामांना उष्टी बोरे चाखायला देणारी शबरी माता असो, किंवा आताच्या आधुनिक काळातील इचलकरंजीतील कौशल्या आजींचा अखंड राम नामाचा जप. दोन्ही गोष्टीतून अपार श्रद्धा आणि आपल्या इष्ट देवाला प्रसन्न करण्याची जिद्द, चिकाटी दिसून येते. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज सर्वदूर साजरा होत असताना कौशल्या आजींचा हा अखंड जप पुढील पिढीसाठी प्रेरणा बनून राहिला आहे.