मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व
वृत्तसंस्था/ मुंबई
रविवारी येथे झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या धावपटूंनी आपले निर्विवाद वर्चस्व राखताना पुरूष आणि महिला विभागातील अजिंक्यपदे मिळविली. पुरूष विभागात इथोपियाचा हेली लिमी बेरहेनु तर महिलांच्या विभागात अॅबेरेश मिनसेओ यांनी विजेतेपदे मिळविली. भारतीय स्पर्धकांमध्ये पुरूष विभागात श्रीनु बुगटाने तर महिलांच्या विभागात निर्माबेन ठाकूर भरतजीने विजेतेपद मिळविले.
पुरूषांच्या इलाईट विभागामध्ये इथोपियाच्या विद्यमान विजेत्या हेली लिमी बेरहेनुने 2 तास 07 मिनिटे 50 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक, हेमानोथ अल्वेने 2 तास 09 मिनिटे 03 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर मिटकू तेफाने 2 तास 09 मिनिटे आणि 58 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. महिलांच्या विभागात इथोपियाच्या मिनसेओने 2 तास 26 मिनिटे आणि 06 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक, इथोपियाच्या सेगाने 2 तास 26 मिनिटे आणि 51 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर मेदहीन बिजेनीने 2 तास 27 मिनिटे 34 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.
भारतीय स्पर्धकांच्या विभागात श्रीनु बुगटाने 2 तास 17 मिनिटे 29 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान तर गोपी थोनाकलने दुसरे तसेच शेरसिंग तनवारने तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या विभागात निर्माबेन ठाकूर भरतजीने 2 तास 47 मिनिटे 11 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले असून रेष्मा केवातेने दुसरे तसेच पश्चिम बंगालच्या शामली सिंगने तिसरे स्थान घेतले. पुरूषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये सावन बरवालने सुवर्ण, किरण म्हात्रेने रौप्य आणि मोहन सैनीने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये अम्रिता पटेलने पहिले, पुनम सोनेनीने दुसरे तर कविता यादवने तिसरे स्थान घेतले.
Home महत्वाची बातमी मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व
मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचे वर्चस्व
वृत्तसंस्था/ मुंबई रविवारी येथे झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या धावपटूंनी आपले निर्विवाद वर्चस्व राखताना पुरूष आणि महिला विभागातील अजिंक्यपदे मिळविली. पुरूष विभागात इथोपियाचा हेली लिमी बेरहेनु तर महिलांच्या विभागात अॅबेरेश मिनसेओ यांनी विजेतेपदे मिळविली. भारतीय स्पर्धकांमध्ये पुरूष विभागात श्रीनु बुगटाने तर महिलांच्या विभागात निर्माबेन ठाकूर भरतजीने विजेतेपद मिळविले. पुरूषांच्या इलाईट विभागामध्ये इथोपियाच्या विद्यमान विजेत्या हेली लिमी […]