हर्ष मंदर यांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड

एनजीओच्या विदेशी फंडिंगप्रकरणी कारवाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदर यांच्या कार्यालयावर सीबीआयने शुक्रवारी छापा टाकला आहे. एफसीआरएच्या उल्लंघनाप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. हर्ष मंदर यांनी अमन बिरादरी नावाने एक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) स्थापन केली आहे. हर्ष मंदर यांच्या याच एनजीओच्या विदेशी फंडिंगप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने मागील वर्षीच सीबीआय चौकशी सुरू करविली […]

हर्ष मंदर यांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड

एनजीओच्या विदेशी फंडिंगप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदर यांच्या कार्यालयावर सीबीआयने शुक्रवारी छापा टाकला आहे. एफसीआरएच्या उल्लंघनाप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. हर्ष मंदर यांनी अमन बिरादरी नावाने एक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) स्थापन केली आहे.
हर्ष मंदर यांच्या याच एनजीओच्या विदेशी फंडिंगप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने मागील वर्षीच सीबीआय चौकशी सुरू करविली होती. यापूर्वी 2021 मध्ये ईडीने देखील मनी लॉन्ड्रिंगशी निगडित एका प्रकरणी हर्ष मंदर यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. त्यांच्या दोन एनजीओंवरून ही चौकशी सुरू आहे. हर्ष मंदर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी देखील सीबीआयचे पथक पोहोचल्याचे समजते.
हर्ष मंदर यांनी अन्नाचा अधिकार, माहितीचा अधिकार, वेठबिगारी विरोधी चळवळ आणि आदिवासींच्या अधिकारांसाठी कथित स्वरुपात सक्रीय भूमिका बजावली आहे. दिल्लीतील थिंक टँग सेंटर फॉर इक्विटी स्टडीजचे ते संचालक देखील आहेत.  संपुआ सरकारमध्ये ते राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य होते. या परिषदेचे नेतृत्व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी करत होत्या.