सव्वापाच लाखाची रोकड जप्त
कलखांब तपासनाक्यावर दोन कारमध्ये आढळली रक्कम
बेळगाव : गोकाकहून बेळगावकडे येणाऱ्या दोन कार अडवून कलखांब तपासनाक्यावर पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता दोन्ही कारमध्ये 5 लाख 26 हजार 500 रुपये रोकड आढळून आली आहे. ही रक्कम वाहतूक करण्यासंबंधी संबंधितांकडे कसलीच कागदपत्रे नव्हती. केए 49 एम 4547 क्रमांकाची कार अडवून तपासणी करण्यात आली. गोकाक येथील अमित अशोक पत्तार यांची ही कार असून ते बेळगावला येत होते. या कारमध्ये 3 लाख 31 हजार रुपयाची रोकड आढळून आली आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. गोकाकहून बेळगावकडे येणाऱ्या केए 22 एमसी 3551 क्रमांकाच्या कारमध्येही 1 लाख 95 हजार 500 रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. ही कार महेंद्र मारुती पत्तार यांची असून पोलिसांनी या दोन्ही प्रकरणातील संबंधितांना नोटीस दिली आहे.
Home महत्वाची बातमी सव्वापाच लाखाची रोकड जप्त
सव्वापाच लाखाची रोकड जप्त
कलखांब तपासनाक्यावर दोन कारमध्ये आढळली रक्कम बेळगाव : गोकाकहून बेळगावकडे येणाऱ्या दोन कार अडवून कलखांब तपासनाक्यावर पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता दोन्ही कारमध्ये 5 लाख 26 हजार 500 रुपये रोकड आढळून आली आहे. ही रक्कम वाहतूक करण्यासंबंधी संबंधितांकडे कसलीच कागदपत्रे नव्हती. केए 49 एम 4547 क्रमांकाची कार अडवून तपासणी करण्यात आली. गोकाक […]