व्हेनेझुएलाला नमवून कॅनडा उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/नवी दिल्ली 2024 च्या कोपा अमेरिका चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत कॅनडाने व्हेनेझुएलाचा पेनल्टीमध्ये पराभव करत पदार्पणातच या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्याचा नवा इतिहास घडविला. कॅनडा आणि व्हेनेझुएला यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टीचा अवलंब केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये कॅनडाने व्हेनेझुएलाचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्यफेरीत […]

व्हेनेझुएलाला नमवून कॅनडा उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2024 च्या कोपा अमेरिका चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत कॅनडाने व्हेनेझुएलाचा पेनल्टीमध्ये पराभव करत पदार्पणातच या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्याचा नवा इतिहास घडविला.
कॅनडा आणि व्हेनेझुएला यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टीचा अवलंब केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये कॅनडाने व्हेनेझुएलाचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या पाच फटक्यावर गोल केले. पण सहाव्या फटक्यावर व्हेनेझुएलाच्या अॅंजेलचा फटका कॅनडाचा गोलरक्षक क्रेपॉने अडविला. त्यानंतर कॅनडाच्या सहाव्या फटक्यावर इस्मेल कोनेने अचुक करुन व्हेनेझुएलाचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत मंगळवारी कॅनडा आणि विश्व करंडक विजेता अर्जेंटिना यांच्यात उपांत्य फेरीचा सामना न्यु जर्सीमध्ये मंगळवारी खेळविला जाणार आहे. त्यानंतर 14 जुलै रोजी स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.
कॅनडा आणि व्हेनेझुएला यांच्यातील झालेल्या सामन्यात 13 व्या मिनीटाला मिळालेल्या पेनल्टीवर जेकॉब शेफलबर्गने डेव्हिडच्या पासवर कॅनडाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत कॅनडाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्याने त्यांना आपली आघाडी वाढविता आली नाही. 64 व्या मिनीटाला राँडनने कॅनडाच्या बचाव फळीतील खेळाडूंना तसेच तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत व्हेनेझुएलाला बरोबरी साधून दिली होती. शेवटच्या चार मिनीटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश न आल्याने हा सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये निकाली करण्यात आला.