कॅमेरॉन नोरी दुसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरीओ एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या रिओ खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीने एकेरीत विजयी सलामी दिली. पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात नॉरीने बोलिव्हियाच्या युगो डिलेनचा 6-3, 6-2 असा पराभव केला. 2023 साली झालेल्या या स्पर्धेत नॉरीने अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा पराभव केला होता. आता नॉरीचा दुसऱ्या फेरीतील सामना चिलीच्या […]

कॅमेरॉन नोरी दुसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरीओ
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या रिओ खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीने एकेरीत विजयी सलामी दिली.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात नॉरीने बोलिव्हियाच्या युगो डिलेनचा 6-3, 6-2 असा पराभव केला. 2023 साली झालेल्या या स्पर्धेत नॉरीने अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा पराभव केला होता. आता नॉरीचा दुसऱ्या फेरीतील सामना चिलीच्या टॉमस बॅरीओसशी होणार आहे.