निवडणुकीनंतर बससेवा सुरळीत
निवडणुकीचा ताण संपला : विविध मार्गांवर बस मार्गस्थ
बेळगाव : निवडणुकीमुळे मागील चार दिवसांपासून विस्कळीत झालेली बससेवा अखेर गुरुवारपासून सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसाठी 166 बसेस विविध मार्गांवर धावल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवर ताण वाढला होता. परिणामी प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. अखेर निवडणुकीतील बसेस गुरुवारपासून पूर्ववत झाल्या आहेत. यात्रा-जत्रा, लग्नसराई यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यातच शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची भर पडली आहे. त्यामुळे बससेवेचे तीनतेरा वाजू लागले आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी बसचे नियोजन करताना परिवहनची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी 400 बसेसची मागणी केली होती. मात्र, परिवहनच्या ताफ्यातच बसेसची कमतरता असल्याने केवळ 200 बसेस देण्याचे परिवहनने मान्य केले होते. निवडणुकीत पोलीस, राखीव दलाचे जवान, निवडणूक कर्मचारी आणि साधनसामग्रीची ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसचा वापर करण्यात आला. परिवहनने 166 बस दिल्या होत्या. त्यामुळे इतर लांब आणि स्थानिक मार्गावर बसेसची कमतरता जाणवली होती.
बेळगाव विभागात 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. बसेसची कमतरता असल्याने परिवहनने राज्य सरकारकडे नवीन बसेसची मागणी केली होती. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून नवीन बसेस देण्यास दिरंगाई होऊ लागली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या बसेसवरच परिवहनचा डोलारा सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीत निवडणूक यात्रा-जत्रा आणि उन्हाळी हंगाम साधताना परिवहनसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शाळांना सुटी असल्याने कुटुंबासह ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, बसफेऱ्या कमी असल्याने विविध मार्गांवर गैरसोय होऊ लागली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातही यात्रा-जत्रा, लग्नसराईमुळे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासन् तास ताटकळत थांबावे लागत आहे.
Home महत्वाची बातमी निवडणुकीनंतर बससेवा सुरळीत
निवडणुकीनंतर बससेवा सुरळीत
निवडणुकीचा ताण संपला : विविध मार्गांवर बस मार्गस्थ बेळगाव : निवडणुकीमुळे मागील चार दिवसांपासून विस्कळीत झालेली बससेवा अखेर गुरुवारपासून सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसाठी 166 बसेस विविध मार्गांवर धावल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवर ताण वाढला होता. परिणामी प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. अखेर निवडणुकीतील बसेस गुरुवारपासून पूर्ववत झाल्या आहेत. यात्रा-जत्रा, […]