विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात

शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे परंपरेनुसार गुरुवारी शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी उद्यानात प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष सुनील जाधव, जे. बी. शहापूरकर, मारुती पाटील, उमेश ताशिलदार, विजय कुंटे आदी उपस्थित होते. भाजपतर्फे शिवजयंती भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भाजप […]

विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात

शिवजयंती चित्ररथ महामंडळ
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे परंपरेनुसार गुरुवारी शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी उद्यानात प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष सुनील जाधव, जे. बी. शहापूरकर, मारुती पाटील, उमेश ताशिलदार, विजय कुंटे आदी उपस्थित होते.
भाजपतर्फे शिवजयंती
भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले. महिला व भगिनींनी आरती केली. याप्रसंगी प्रज्ञा शिंदे, प्रियांका कलघटकर, रेखा मुचंडी, रुपेश पाटील, राजन व मयुर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
नानावाडीत शिवजयंती
नानावाडी येथील शिवभक्तांनी महिपाळगड येथून शिवज्योत आणली. यामध्ये शिवा, संदीप, सूरज, गणेश, प्रथमेश, अनिरुद्ध, चैतन्य या शिवभक्तांचा समावेश होता.
अनंतशयन गल्ली
अनंतशयन गल्ली येथील भगवे वादळ युवक संघातर्फे येथील रेणुका मंदिरात शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पार्वती माळी, उमा नाईक, सुनीता काळे, चंद्रकांत माळी आदी उपस्थित होते.
मंगाईनगर रहिवासी संघ
श्री मंगाईनगर रहिवासी संघ शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने किल्ले पारगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष बंडू केरवाडकर, उपाध्यक्ष श्रीधर बिर्जे यांनी शिवमूर्तीचे पूजन केले. याप्रसंगी सागर पाटील, प्रशांत हणगोजी, अनिकेत नरगुंदकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुती गल्ली, अनगोळ
मारुती गल्ली, अनगोळ येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी महापौर शोभा सोमनाचे आणि महिलांनी पाळणागीत सादर केले.
जिजाऊ ब्रिगेड हिंदुस्थान
जिजाऊ ब्रिगेड हिंदुस्थानतर्फे शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांच्यासमवेत गीतांजली चौगुले, दीपाली मलकारी, नीना काकतकर, मंगल पाटील, आशाराणी निंबाळकर, वृषाली मोरे, राजश्री आजगावकर उपस्थित होत्या.
जगदीश शेट्टरांतर्फे शिवमूर्तीचे पूजन
भाजपतर्फे छत्रपती शिवाजी उद्यानात महाराजांच्या मूर्तीला मालार्पण करण्यात आले. याप्रसंगी लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसेवक राजू डोणी, संतोष पेडणेकर, श्रीनिवास बिसनकोप्प, विजय कदम यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
शिवसंदेश भारत-यश ऑटो शिवसंदेश भारत व यश
ऑटोतर्फे शिवजयंती साजरी केली. प्रकाश मरगाळे अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन केले. यावेळी राजेंद्र मुतगेकर यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, महादेव चौगुले, अॅड. सुधीर चव्हाण, डी. बी.पाटील, रणजित चौगुले, अॅड. अमर यळ्ळूरकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन एल. पी.पाटील यांनी केले. तर आभार रवी पाटील यांनी मानले.
बिच्चू गल्ली-गाडेमार्ग शहापूर येथे महाप्रसादाचे वितरण
शिवजयंतीनिमित्त बिच्चू गल्ली-गाडेमार्ग शहापूर येथील धर्मवीर संभाजी युवक मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ शिवभक्तांनी घेतला. प्रारंभी म. ए. समितीचे शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय बैलुरकर, सुरज जाधव, अशोक गगवे, प्रवीण पाटील, गणेश माळवी, विनय पाटील, अमित पाटील, श्री. पाटील, आप्पाजी काकतकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अनगोळ
अनगोळ येथे भक्तीभावाने शिवजयंतीला सुरूवात झाली आहे. अनगोळ येथील प्रत्येक गल्लीमध्ये व चौकामध्ये भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन महिलांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा केला. सुवासिनींनी शिवरायांचा पाळणा म्हटला. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये व जयघोषामध्ये शिवजयंतीला सुरूवात झाली. अनगोळ येथील जय भवानी युवक मंडळ-विद्यानगर, जय अमर शिवाजी युवक मंडळ, कुरबुर गल्ली, ध. संभाजी चौक, शिवनेरी युवक मंडळ-रघुनाथ पेठ, बाल शिवाजी युवक मंडळ, बाबले गल्ली क्रॉस, नवक्रांती युवक मंडळ-नाथ पै नगर, जय शिवराय युवक मंडळ-बाबले गल्ली, बजरंगी तालीम, लोहार गल्ली, भांदूर गल्ली-युवक मंडळ, हनुमान व्यायाम शाळा, मारुती गल्ली येथील युवक मंडळांनी शिवमूर्तीचे पूजन केले. यावेळी महिला व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.