बीआरएस नेत्याच्या कारची धडक, महिलेचा मृत्यू
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या हनुमाकोंडा जिल्ह्dयात बीआरएसचे माजी आमदार टी. राजैया यांच्या कारची धडक बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मडीकोंडा येथे शनिवारी रात्री रस्ता ओलांडत असताना या महिलेला राजैया यांच्या कारने धडक दिली होती.
दुर्घटनेवेळी कार आमदार चालवित नव्हते. परंतु राजैया दुर्घटनेवेळी कारमधून प्रवास करत होते. महिलेला धडक बसल्यावर कार काही अंतरानंतर रोखण्यात आली. दुर्घटनेत सामील कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर मृत महिलेच्या पतीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी दुर्घटना नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. मागील काही काळात अनेक राजकीय नेते आणि बिल्डर्सच्या वाहनांनी धडक दिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात आता तेलंगणातील घटनेची भर पडली आहे.
Home महत्वाची बातमी बीआरएस नेत्याच्या कारची धडक, महिलेचा मृत्यू
बीआरएस नेत्याच्या कारची धडक, महिलेचा मृत्यू
वृत्तसंस्था/ हैदराबाद तेलंगणाच्या हनुमाकोंडा जिल्ह्dयात बीआरएसचे माजी आमदार टी. राजैया यांच्या कारची धडक बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मडीकोंडा येथे शनिवारी रात्री रस्ता ओलांडत असताना या महिलेला राजैया यांच्या कारने धडक दिली होती. दुर्घटनेवेळी कार आमदार चालवित नव्हते. परंतु राजैया दुर्घटनेवेळी कारमधून प्रवास करत होते. महिलेला धडक बसल्यावर कार काही अंतरानंतर रोखण्यात आली. […]