बोपन्ना-एब्डन उपांत्यपूर्व फेरीत

बोपन्ना-एब्डन उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथिदार मॅथ्यू एब्डन यांनी पुरूष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या या मियामी टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात टॉप सिडेड जोडी बोपन्ना आणि एब्डन यांनी हुगो निस आणि जेन झिलेंस्कि यांचा 7-5, 7-6 (7-3) असा पराभव केला. हा सामना 100 मिनिटे चालला होता. बोपन्ना आणि एब्डन यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाचा जॉन स्मिथ आणि हॉलंडचा व्हरबेक यांच्याशी होणार आहे. बोपन्ना आणि एब्डन यांनी गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले होते.