आज ठरणार भाजपचे गोव्यातील उमेदवार
गोव्याचे लक्ष भाजपच्या आजच्या बैठकीवर : दोन जागांसाठी 9 उमेदवारांची यादी,मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष पोहोचले दिलीत
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यातील दोन्ही जागांचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आज गुरुवारी नवी दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ठरवणार आहे. संपूर्ण गोव्याचे लक्ष त्याकडे लागून राहिले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे या बैठकीत सहभागी होतील. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती रमेश तवडकर यांच्यासह दक्षिण गोव्यातील पाच उमेदवारांच्या नावांची यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे सोपविली आहे. उत्तर गोव्यातील चार उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना सोपविली असून त्यामध्ये विद्यमान खासदार श्रीपाद नाईक, दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर, व दिलीप पऊळेकर यांच्या नावाचा समावेश आहे.
उत्तर गोव्यात दिलीप परुळेकर व श्रीपाद नाही यांच्यामध्ये खरी चुरस आहे. दक्षिण गोव्यात पाच नावांपैकी मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्याला निवडणूक लढवायची नाही असे पक्षाला स्पष्ट सांगितले असले तरीदेखील गोव्यातील भाजप नेत्यांनी दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर या दोघांचीही नावे यादीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि दामू नाइक यांच्या नावाचाही समावेश करण्यात आलेला आहे.
प्रत्यक्षात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे दोघेही बुधवारी नवी दिल्लीला गेले आणि त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजप अध्यक्षांकडून आपापल्या राज्यातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार अनेक राज्यांतील प्रदेश भाजप अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री हे देखील नवी दिल्लीत उपस्थित राहिले आहेत. गोव्यातील उमेदवार निश्चित करण्यासाठी होणाऱ्या बैठकीवेळी मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजप अध्यक्ष या दोघांनाही बैठकीत समाविष्ट करून घेतले जाईल. प्राप्त परिस्थितीनुसार दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर या दोघांनीही निवडणूक लढविण्यास नकार दिला असला तरी गोव्यात झालेले पक्षांतर्गत सर्वेक्षण आणि प्रदेश भाजपने ज्या काही शिफारसी केल्या होत्या, त्यानुसार या दोघांच्या नावांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
उमेदवारीबाबत आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक
आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील उमेदवार निश्चित होणार आहेत. महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचा निर्णय आज होईल. गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांवर आजच शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. ही बैठक सायंकाळी 7 वा. होईल.
Home महत्वाची बातमी आज ठरणार भाजपचे गोव्यातील उमेदवार
आज ठरणार भाजपचे गोव्यातील उमेदवार
गोव्याचे लक्ष भाजपच्या आजच्या बैठकीवर : दोन जागांसाठी 9 उमेदवारांची यादी,मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष पोहोचले दिलीत पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यातील दोन्ही जागांचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आज गुरुवारी नवी दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ठरवणार आहे. संपूर्ण गोव्याचे लक्ष त्याकडे लागून राहिले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट […]