धूम स्टाईलने मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद
दोघे ही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार : पाच मोबाईल हॅन्डसेट, मोपेड असा १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त,शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई
इचलकरंजी : मोबाईलवर बोलत जात असलेल्या पादचारी व्यक्तीकडील मोबाईल हॅन्डसेट सिने स्टाईलने दुचाकीवरुन येवून, हिसकावून घेवून पोबारा करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगाराना पोलिसांनी अटक केली. राहुल विनोद पाथरवट, अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कामते ( दोघे रा. साईट नं 102, आसरानगर, इचलकरंजी ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल हॅन्डसेट, मोपेड असा १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची केली आहे, अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांनी दिली. पोलीस निरीक्षक भुजबळ म्हणाले, तारदाळ, संगमनगरातील (ता. हातकणंगले) राजकुमार किशोरीलाल यादव हा तरुण शहराजवळच्या पार्वती इंस्डस्ट्रीजमध्ये एका खासगी कंपनीत काम करतो आहे. तो कामावरून घरी येत असताना मोबाईलवर बोलत पायी येत होता. यावेळी त्यांच्या कडील मोबाईल हॅन्डसेट मोपेडवरुन पाठीमागून आलेल्या दोन तरुणानी हिसडा मारुन चोरुन, धूम स्टाईलने पलायन केल्याची घटना १ फेब्रुवारी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल पाथरवट, अमोल उर्फ रविंद्र कामते या दोघाना अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान दोघानी धूम स्टाईलने पाच ठिकाणी मोबाईल चोरल्याची कबूली दिली. त्यावरुन त्याच्याकडून चोरीचे पाच मोबाईल हॅन्डसेट आणि या चोरीत वापरलेली मोपेड असा १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हेगार राहुल पाथरवट याच्याविरोधी गंभीर स्वरुपाचे ७ तर अमोल उर्फ रविंद्र कामते विरोधी गंभीर स्वरुपाचे 4 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी दिली.
Home महत्वाची बातमी धूम स्टाईलने मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद
धूम स्टाईलने मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद
दोघे ही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार : पाच मोबाईल हॅन्डसेट, मोपेड असा १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त,शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई इचलकरंजी : मोबाईलवर बोलत जात असलेल्या पादचारी व्यक्तीकडील मोबाईल हॅन्डसेट सिने स्टाईलने दुचाकीवरुन येवून, हिसकावून घेवून पोबारा करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगाराना पोलिसांनी अटक केली. राहुल विनोद पाथरवट, अमोल उर्फ […]