भाजपचा जाहीरनामा ‘ग्यान’वर आधारित

गोरगरीब, युवावर्ग, शेतकऱ्यांसह महिला सक्षमीकरणावर भर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता तीन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत सर्व पक्ष आपला जाहीरनामा लवकरच जाहीर करू शकतात. भाजपचा जाहीरनामा ‘ग्यान’वर (जीवायएएन) आधारित असून त्या 4 शब्दांचा अर्थ जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे युवा, ए म्हणजे अन्नदाता आणि एन म्हणजे नारीशक्ती असा […]

भाजपचा जाहीरनामा ‘ग्यान’वर आधारित

गोरगरीब, युवावर्ग, शेतकऱ्यांसह महिला सक्षमीकरणावर भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता तीन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत सर्व पक्ष आपला जाहीरनामा लवकरच जाहीर करू शकतात. भाजपचा जाहीरनामा ‘ग्यान’वर (जीवायएएन) आधारित असून त्या 4 शब्दांचा अर्थ जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे युवा, ए म्हणजे अन्नदाता आणि एन म्हणजे नारीशक्ती असा आहे. पुढील पाच वर्षे सत्तेत आल्यानंतर भाजपला सर्वसामान्य जनतेतील गोरगरीब, तऊण, शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर काम करायचे आहे, असे यातून सूचित करायचे आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. या समितीकडून विकसित भारताचा अजेंडा आणि रूपरेषा तयार करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. भाजपच्या आठ केंद्रीय मंत्री आणि चार मुख्यमंत्र्यांशिवाय भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीमध्ये अनेक माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या समितीची पहिली बैठक 1 एप्रिल रोजी झाली. या बैठकीत जाहीरनाम्यातील घोषणांवर चर्चा झाली आहे. सध्या भाजपला त्यांच्या मिस कॉल सेवेद्वारे 3.75 लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अॅपवर सुमारे 1.70 लाख सूचना प्राप्त झाल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजपचे ‘मिशन 2047’
भाजप जाहीरनामा समितीच्या बैठकीत 2047 पर्यंत विकसित भारताच्या ब्लू प्रिंटवर चर्चा करण्यात आली. आमच्या जाहीरनाम्यातील लोकांचा उत्साहपूर्ण सहभाग हा त्यांचा पंतप्रधानांवरील विश्वास आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा दर्शवतो, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. लोकांकडून आलेल्या सर्व सूचनांची वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केल्यानंतर त्यावर चर्चा करून त्यांचे निराकरण केले जाईल. तसेच पंतप्रधान मोदी सतत गरीब, तऊण, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी त्यांच्या सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकत असल्याने, सत्ताधारी पक्ष त्यांच्याशी संबंधित समस्यांना महत्त्व देण्याची शक्मयता आहे.
काँग्रेसची ‘घर-घर गॅरंटी’ मोहीम
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी ‘घर-घर गॅरंटी’ अभियानाला सुऊवात केली. या अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देशातील कोट्यावधीं लोकांच्या घरात पोहोचून जनतेला काँग्रेसच्या हमीभावाची माहिती देणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी ईशान्य दिल्लीतील उस्मानपूर काठियावाडा येथे आयोजित कार्यक्रमात ‘घर-घर गॅरंटी’ मोहिमेचा शुभारंभ केला. पक्षाची ही मोहीम ‘पाच न्याय’ आणि ‘25 हमी’वर आधारित आहे. याअंतर्गत आठ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसच्या पंच न्यायमध्ये युवा न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, कामगार न्याय आणि सामायिक न्याय यांचा समावेश आहे.
काँग्रेसने दिलेली आश्वासने
युवा न्याय अंतर्गत, काँग्रेस पक्षाने प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि युवकांना एक वर्षासाठी 1 लाख ऊपये देण्याचे आश्वासन दिले आहे. सामायिक न्याय अंतर्गत, पक्षाने जात-आधारित जनगणना करण्याची आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा काढून टाकण्याची हमी दिली आहे. किसान न्याय अंतर्गत शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीसाठी कायदेशीर दर्जा, कर्जमाफीसाठी आयोगाची स्थापना आणि जीएसटीमुक्त शेती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कामगार न्यायामध्ये आरोग्याचा हक्क, किमान वेतन इत्यादी आश्वासनांचा समावेश आहे. काँग्रेस पक्ष 5 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करू शकतो. या निवडणुकीसाठी ‘हात बदलणार हालत’ असा नारा काँग्रेसने निश्चित केला आहे.