सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरणीसह बंद

सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरणीसह बंद

बुधवारचे सत्रही प्रभावीत : गुंतवणूकदारांची सावध भूमिका
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी बाजारात घसरण सत्र राहिले आहे. बुधवारचे सत्र हे घसरणीसोबत सुरु झाले हीच स्थिती बंद होतानाही राहिली होती. यामध्ये अमेरिकेच्या केंद्रीय बँकेकडून व्याजदरात कपात होण्याचे संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी आपली भूमिका सावधपणे घेण्यास सुरुवात केली असल्याचेही बुधवारी पहावयास मिळाले आहे.
शेअर बाजार अभ्यासकांच्या मते, तैवानमध्ये आलेला शक्तीशाली भूकंपाच्या घटनेमुळे भारतीय बाजारात घसरण राहिली आहे. कारण चिप निर्मितीमधील कार्यरत असणाऱ्या कंपन्या या जास्तीत जास्त तैवानमध्ये आहेत. यामुळे पुरवठा साखळी खंडित होण्याच्या भीतीमुळे ही घसरण राहिल्याची नोंद केली आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 27.09 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.04 टक्क्यांसोबत 73,876.82 वर बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 18.65 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 22,434.65 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये निफ्टीतील रियल्टी इंडेक्स 2.6 टक्क्यांनी, एफएमसीजी हे घसरणीत राहिले तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक 1.8 टक्क्यांनी वधारला आहे. यासोबतच पॉवर, फार्मा आणि कंझ्युमर या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी राहिली. एस अॅण्ड पी बीएसई मिडकॅप निर्देशांक बुधवारी जवळपास 1 टक्क्यांनी तेजीत राहिल्याची नोंद केली होती.
दिग्गज कंपन्यांमध्ये निफ्टीत बँक, आयटी, आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या, मीडिया या सारख्या क्षेत्रात तेजीत राहिली होती. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, डॉक्टर रे•ाr, कोटक बँक आणि ब्रिटानिया हे सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत.
मागील 10 वर्षांमध्ये अमेरिकन ट्रेझरीचा यील्ड जवळपास 14 बेसिस पाँईटने वधारुन 4.34 टक्क्यांवर आला आहे.