पाकिस्तानच्या विरोधात तालिबानचे मोठे पाऊल
पीओकेवरील पाकिस्तानचा दावा अमान्य : भारताच्या भूमिकेचे समर्थन
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. तालिबानने पाकव्याप्त काश्मीरवरील पाकिस्तानचा दावा मान्य करण्यास नकार दिला आहे. तालिबानने तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या सीमांचे मूल्यांकन केले आहे. तालिबानच्या सीमा तसेच आदिवासी विषयक मंत्रालयाने पाकिस्तानसोबतची काल्पनिक रेषा (संभाव्य डूरंड लाइन), ताजिकिस्तान आणि जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या अधिकृत सीमांचे मूल्यांकन केले आहे.
तालिबानने जम्मू-काश्मीरमधील एका हिस्स्यावर असलेला पाकिस्तानचा कब्जाच चुकीचा ठरविला आहे. भारताने देखील सुरुवातीपासून पाकिस्तानच्या या कब्जाला विरोध दर्शविला आहे. भारताने कधीच पाकिस्तानच्या कब्जाला मान्यता दिलेली नाही. तसेच पीओके हा जम्मू-काश्मीरचा म्हणजेच भारताचा अविभाज्य भाग असून त्यावर पुन्हा नियंत्रण मिळविण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
तालिबानच्या सीमा आणि आदिवासी मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार त्याने तीन दशकांनी अफगाणिस्तानच्या सीमांचे मूल्यांकन केले आहे. यात पाकिस्तान, जम्मू-काश्मीर (भारत), ताजिकिस्तान आणि चीन सीमा सामील आहे. मंत्रालयाच्या एका शिष्टमंडळाने वखान, जेबक आणि बदख्शांमध्ये पाकिस्तानसोबतची काल्पनिक रेषा, जम्मू-काश्मीर आणि ताजिकिस्तानसोबतच्या अधिकृत सीमांचे मूल्यांकन केले आहे.
पाकिस्तानला मोठा झटका
तालिबानने आता पाकिस्तानचा पीओकेवरील दावाच फेटाळला आहे. तालिबानने आता अफगाणिस्तानची सीमा थेट भारताच्या जम्मू-काश्मीरला लागून असल्याचे मान्य केले आहे. भारताच्या भूमिकेला एकप्रकारे तालिबानने पाठिंबाच दर्शविला आहे. तर तालिबानचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा झटका ठरला आहे.
Home महत्वाची बातमी पाकिस्तानच्या विरोधात तालिबानचे मोठे पाऊल
पाकिस्तानच्या विरोधात तालिबानचे मोठे पाऊल
पीओकेवरील पाकिस्तानचा दावा अमान्य : भारताच्या भूमिकेचे समर्थन वृत्तसंस्था/ काबूल अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. तालिबानने पाकव्याप्त काश्मीरवरील पाकिस्तानचा दावा मान्य करण्यास नकार दिला आहे. तालिबानने तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या सीमांचे मूल्यांकन केले आहे. तालिबानच्या सीमा तसेच आदिवासी विषयक मंत्रालयाने पाकिस्तानसोबतची काल्पनिक रेषा (संभाव्य डूरंड लाइन), ताजिकिस्तान आणि जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या अधिकृत […]