लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची केंद्र सरकारची मोठी घोषणा

केंद्र सरकारने लडाख बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लडाख मध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. लडाख मध्ये झांस्कर, द्रास, नुब्रा, शाम आणि …

लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची केंद्र सरकारची मोठी घोषणा

केंद्र सरकारने लडाख बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लडाख मध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. लडाख मध्ये झांस्कर, द्रास, नुब्रा, शाम आणि चांगथांग हे 5 नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहे. 

या पाच नवीन जिल्ह्यांत प्रत्येक गल्ली, परिसर मध्ये प्रशासन बळकट करून लोकांचे फायदे केले जातील. लडाखमधील लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. 

अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर म्हणाले की, समृद्ध आणि विकसित लडाख बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला पुढे नेत केंद्रशासित प्रदेशात  पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.ते म्हणाले, लडाख मध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या दिशेने वाढणारा पाऊल आहे.लडाखच्या रहिवाशांचे अभिनंदन.

आता पर्यंत लडाख मध्ये दोनच जिल्हे होते लेह आणि कारगिल.आता नवीन पाच जिल्ह्यांची निर्मिती झाल्यामुळे लडाखमध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 झाली आहे. 

Edited by – Priya Dixit   

 

 

Go to Source