राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवण्यात येणार
बदलापूर बलात्कार प्रकरणावरून संताप व्यक्त होत असतानाच राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. नुकतीच दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटनही बसवले जाणार आहे. यामुळे पोलिसांना त्वरीत गैरप्रकाराची माहिती मिळेल, अशी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, बदलापूर घटनेबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘राज्यातील सर्व शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटन लावले जाणार आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आहे. पॅनिक बटणद्वारे पोलिसांना गैरप्रकाराची त्वरीत माहिती मिळेल.’ पुढे दीपक केसरकर म्हणाले की, ‘मुंबई परिक्षेत्राच्या उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने बदलापूर घटनेचा तपास केला. या तपासात विविध विभागांचे लोक सहभागी झाले होते. कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करायचे, हे पोलिस ठरवतील. निष्काळजीपणा आढळलेल्याची सहआरोपी म्हणून ओळख पटली आहे. त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील.’मुलांवरील लैंगिक अत्याचाराची माहिती मिळताच प्रत्येक प्राधिकरणाला पुढील कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे. परंतु, बदलापूर शाळा प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. पॉक्सो कायद्यातील कलम 19 मधील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बदलापूरच्या विशेष तपास पथकाने 23 ऑगस्ट रोजी शाळा प्रशासनाविरुद्ध एफआयआर दाखल केला. एसआयटीने दोन्ही अल्पवयीन मुलींसह त्यांच्या पालकांचे जबाबही नोंदवले.हेही वाचामुंबई लोकल ट्रेनमध्ये विनयभंगाच्या वाढत्या घटना चिंताजनक
महिला सुरक्षेसाठी मुंबईत विशेष सुरक्षा मोहीम
Home महत्वाची बातमी राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवण्यात येणार
राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवण्यात येणार
बदलापूर बलात्कार प्रकरणावरून संताप व्यक्त होत असतानाच राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. नुकतीच दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटनही बसवले जाणार आहे. यामुळे पोलिसांना त्वरीत गैरप्रकाराची माहिती मिळेल, अशी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बदलापूर घटनेबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘राज्यातील सर्व शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटन लावले जाणार आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आहे. पॅनिक बटणद्वारे पोलिसांना गैरप्रकाराची त्वरीत माहिती मिळेल.’
पुढे दीपक केसरकर म्हणाले की, ‘मुंबई परिक्षेत्राच्या उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने बदलापूर घटनेचा तपास केला. या तपासात विविध विभागांचे लोक सहभागी झाले होते. कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करायचे, हे पोलिस ठरवतील. निष्काळजीपणा आढळलेल्याची सहआरोपी म्हणून ओळख पटली आहे. त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील.’
मुलांवरील लैंगिक अत्याचाराची माहिती मिळताच प्रत्येक प्राधिकरणाला पुढील कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे. परंतु, बदलापूर शाळा प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती.
पॉक्सो कायद्यातील कलम 19 मधील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बदलापूरच्या विशेष तपास पथकाने 23 ऑगस्ट रोजी शाळा प्रशासनाविरुद्ध एफआयआर दाखल केला. एसआयटीने दोन्ही अल्पवयीन मुलींसह त्यांच्या पालकांचे जबाबही नोंदवले.हेही वाचा
मुंबई लोकल ट्रेनमध्ये विनयभंगाच्या वाढत्या घटना चिंताजनकमहिला सुरक्षेसाठी मुंबईत विशेष सुरक्षा मोहीम