बीडीके, एसडीएम संघ विजयी

केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा : ऋषिकेश, निलेश सामनावीर बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एसडीएम धारवाड ब ने अमृत पोतदार सीसीएचा 184 धावांनी तर बीडीके हुबळी अ ने आनंद अकादमीचा 40 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. […]

बीडीके, एसडीएम संघ विजयी

केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा : ऋषिकेश, निलेश सामनावीर
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एसडीएम धारवाड ब ने अमृत पोतदार सीसीएचा 184 धावांनी तर बीडीके हुबळी अ ने आनंद अकादमीचा 40 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. ऋषिकेश के. (एसडीएम), निलेश खिलारे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसडीएम अकादमी ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडीबाद 372 धावा केल्या. त्यात ऋशिकेशने 3 षटकार, 7 चौकारासह 150 धावा करीत दीड शतक झळकविले. त्याला मथंन निलगलीने 69, हबीब ताडपत्रीने नाबाद 34, साईनाथ माळीने 28, तर संयुक्त पाटीलने 29 धावा केल्या. अमृत पोतदार सीसीआयतर्फे अभिलास पुजारीने 3, तर स्वयम अप्पण्णावरने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अमृत पोतदारचा डाव 47.5 षटकात 188 धावात आटोपला. त्यात जिनत मुडलबागीलने 7 चौकारासह 54, शुभम खोतने 27, प्रविण हरिमेठ व अद्वेत यांनी प्रत्येकी 16, तर स्वयंम अप्पण्णावरने 19 धावा केल्या. एसडीएमतर्फे सुदर्शन व हबीब यांनी प्रत्येकी 2 तर शाबास, बसवराज, गजानन व रक्षीत यांनी 1 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात बीडीके अ ने प्रथम फलंदाजी करताना 49. 3 षटकात सर्व गडी बाद 240 धावा केल्या. तर निलेश खेलारेने 70, प्रियदर्शनने 57, अखिलने 25 धावा केल्या. आनंदतर्फे रोहित पाटीलने 4, तर निलेश व विनोद प्रत्येकी 2 गडीबाद प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 50 षटकात 8 गडी बाद 200 धावाच केल्या. त्यात आदेश अर्सने 5 चौकारासह 60, हर्ष पॅटराटने 44, रोहित पाटीलने 24 तर यश कळसण्णावरने 20 धावा केल्या. बीडीकेतर्फे पुरूषत्तोमने 3, अमर घाडीने 2 तर सुर्य व मुकूंद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.

Go to Source