ऑस्ट्रेलियासमोर आज बांगलादेशचे आव्हान
वृत्तसंस्था /नॉर्थ साउंड (अँटिग्वा)
टी-20 विश्वचषकाच्या सुपर एटमधील गट-1 सामन्यात बांगलादेश व ऑस्ट्रेलिया हे संघ भिडणार असून कागदावर बांगलादेशच्या ताकदीची तुलना ऑस्ट्रेलियाशाशी होऊ शकत नसली, तरी ऑसी संघाला सावध राहावे लागेल. 2021 च्या स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलियाला बांगलादेशला कमी लेखण्यातील धोके माहीत असतील. बांगलादेशने 2021 मधील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 1-4 ने नमविले होते आणि भारतीय उपखंडाशी साधर्म्य साधणाऱ्या येथील परिस्थितीमध्ये कोणताही हलगर्जीपणा महागात पडू शकतो. ऑस्ट्रेलिया लेगस्पिनर एडम झॅम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड यासारख्या ‘पार्टटाईम’ गोलंदाजांवर अधिक जबाबदारी टाकू शकते.
येथील खेळपट्टीचा संथपणा लक्षात घेऊन ते डावखुरा फिरकीपटू अॅश्टन आगरला खेळविण्याचा विचार करू शकतो. पण परिस्थिती किंवा खेळपट्टीचे स्वरूप कसेही असले, तरी ऑस्ट्रेलियाची खरी ताकद त्याच्या पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचा समावेश असलेल्या वेगवान गोलंदाजीमध्ये आहे. कमिन्स आणि हेझलवूड स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर या सामन्यात परतणार आहेत. कर्णधार मिचेल मार्शने सुपर एट टप्प्यात गोलंदाजीसाठी स्वत:ला तंदुऊस्त घोषित केल्यामुळे ऑसीजना प्रोत्साहन मिळाले आहे. दुसरीकडे, त्यांचे हेड, डेव्हिड वॉर्नर, मार्श, मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि टीम डेव्हिड हे ‘टॉप-सिक्स’ फलंदाज जगातील कोणत्याही गोलंदाजीसाठी धोकादायक ठरू शकतात. मुस्तफिझूर रहमान, शकीब अल हसन, महमुदुल्लाह आणि तस्किन अहमद यासारखे अनुभवी टी-20 गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखू शकतील, अशी बांगलादेशला आशा आहे. मात्र, बांगलादेशची खरी अडचण फलंदाजीमध्ये आहे.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वा.
Home महत्वाची बातमी ऑस्ट्रेलियासमोर आज बांगलादेशचे आव्हान
ऑस्ट्रेलियासमोर आज बांगलादेशचे आव्हान
वृत्तसंस्था /नॉर्थ साउंड (अँटिग्वा) टी-20 विश्वचषकाच्या सुपर एटमधील गट-1 सामन्यात बांगलादेश व ऑस्ट्रेलिया हे संघ भिडणार असून कागदावर बांगलादेशच्या ताकदीची तुलना ऑस्ट्रेलियाशाशी होऊ शकत नसली, तरी ऑसी संघाला सावध राहावे लागेल. 2021 च्या स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलियाला बांगलादेशला कमी लेखण्यातील धोके माहीत असतील. बांगलादेशने 2021 मधील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 1-4 ने नमविले होते आणि भारतीय […]