टी 20 वर्ल्डकपसाठी बांगलादेश संघाची घोषणा

नजमुल हुसेन शांतोकडे नेतृत्वाची धुरा, शकिब अल हसनचाही समावेश वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसी टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी केली. बांगलादेशच्या टी 20 संघात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतलेले जवळपास सर्व खेळाडू विश्वचषक संघाचा भाग आहेत. टी 20 वर्ल्डकपसाठी संघाचे नेतृत्व […]

टी 20 वर्ल्डकपसाठी बांगलादेश संघाची घोषणा

नजमुल हुसेन शांतोकडे नेतृत्वाची धुरा, शकिब अल हसनचाही समावेश
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसी टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी केली. बांगलादेशच्या टी 20 संघात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतलेले जवळपास सर्व खेळाडू विश्वचषक संघाचा भाग आहेत. टी 20 वर्ल्डकपसाठी संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे सोपवण्यात आले असून तस्कीन अहमदकडे उपकर्णधारपदाची धुरा असेल.
बांगलादेशच्या संघात अनुभवासोबतच नव्या खेळाडूंचाही भरणा आहे. मात्र या संघात अनुभवी मुशफिकर रहीमचा समावेश करण्यात आलेला नाही. गतवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. याशिवाय, संघात लिटन दास, सौम्या सरकार, शाकिब अल हसन, मुस्तफिजूर रेहमान या अनुभवी खेळाडूंना देखील स्थान मिळाले आहे. दरम्यान, शाकिबचा हा नववा टी 20 वर्ल्डकप असणार आहे. शाकिब 2007 च्या पहिल्या टी 20 वर्ल्डकपपासून प्रत्येक स्पर्धेत सहभागी होत आला आहे. टी 20 विश्वचषकात बांगलादेश आपला पहिला सामना 8 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. संघ विश्वचषकाच्या ‘ड‘ गटात आहे. या गटात बांगलादेशसह श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि नेपाळ यांचा समावेश आहे. बांगलादेशला 10 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा साखळी सामना खेळायचा आहे. त्यानंतर 13 जूनला त्यांचा सामना नेदरलँडशी होईल. तर 16 जूनला नेपाळचे आव्हान असेल.
टी20 वर्ल्डकपसाठी बांगलादेश संघ – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार),  तस्किन अहमद (उपकर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, तनजीद हसन, शाकिब अल हसन, तौहीद हृदय, मेहमुदुल्लाह रियाद, जाकेर अली, तन्वीर इस्लाम, साकिब मेहदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रेहमान, तन्झीम हसन.