बांगलादेश, न्यूझीलंड अन् इंग्लंड करणार भारताचा दौरा

5 कसोटी, 8 टी 20 व 3 वनडे खेळणार : बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक वृत्तसंस्था /मुंबई भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाचे 2024-25 मधील मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ या मोसमात बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारतीय संघ प्रथम बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-20 […]

बांगलादेश, न्यूझीलंड अन् इंग्लंड करणार भारताचा दौरा

5 कसोटी, 8 टी 20 व 3 वनडे खेळणार : बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाचे 2024-25 मधील मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ या मोसमात बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारतीय संघ प्रथम बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. नवीन वर्षाच्या आगमनात इंग्लंडचा भारत दौरा पाच टी-20 आणि 3 वनडे सामन्यांसाठी पांढऱ्या चेंडूचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने या तिन्ही मालिकेतील सामन्यांची ठिकाण, वेळ या बाबी जाहीर केल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत बीसीसीआयने याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्डकप नंतर झिंबाब्वे आणि श्रीलंका दौरा करणार आहे. टीम इंडिया झिंबाब्वेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यांनतर श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी 3-3 सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहे, त्यानंतर मायदेशातील मालिकांना सुरुवात होईल.
टीम इंडियाचे वेळापत्रक
बांगलादेशचा भारत दौरा

पहिली कसोटी  19 ते 23 सप्टेंबर,             चेन्नई
दुसरी कसोटी  27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर,   कानपूर
पहिला टी 20    6 ऑक्टोबर,     धर्मशाला.
दुसरा टी 20      9 ऑक्टोबर,     दिल्ली.
तिसरा टी 20     12 ऑक्टोबर,  हैदराबाद.

न्यूझीलंडचा भारत दौरा

पहिली कसोटी                16 ते 20 ऑक्टोबर,     बेंगळूर
दुसरी कसोटी                 24 ते 28 ऑक्टोबर,      पुणे
तिसरी कसोटी                 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई

इंग्लंडचा भारत दौरा, 2025

पहिली टी 20    22 जानेवारी,    चेन्नई
दुसरी टी 20      25 जानेवारी,    कोलकाता
तिसरी टी 20     28 जानेवारी,    राजकोट
चौथी टी 20        31 जानेवारी,    पुणे
पाचवी टी 20     2 फेब्रुवारी,       मुंबई
पहिली वनडे     6 फेब्रुवारी,       नागपूर
दुसरी वनडे       9 फेब्रुवारी,       कटक
तिसरी वनडे      12 फेब्रुवारी,     अहमदाबाद