परिवहन मंडळाच्या बसमधून प्रचार साहित्याच्या वाहतुकीस बंदी

बसमध्ये प्रचार करण्यासही मनाई बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाच्या बसमधून होणाऱ्या मालवाहतुकीवरही बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या प्रचार साहित्याची बसमधून ने-आण करू नये, याबरोबरच बसमध्ये प्रचार करू नये, अशी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होईल, अशा वस्तूंची किंवा साहित्याची बसमधून ने-आण करू नये, अशी सूचना बसचालक व वाहकांना करण्यात […]

परिवहन मंडळाच्या बसमधून प्रचार साहित्याच्या वाहतुकीस बंदी

बसमध्ये प्रचार करण्यासही मनाई
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाच्या बसमधून होणाऱ्या मालवाहतुकीवरही बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या प्रचार साहित्याची बसमधून ने-आण करू नये, याबरोबरच बसमध्ये प्रचार करू नये, अशी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होईल, अशा वस्तूंची किंवा साहित्याची बसमधून ने-आण करू नये, अशी सूचना बसचालक व वाहकांना करण्यात आली आहे. मतदारांना आमिष ठरतील, अशा कोणत्याही वस्तू किंवा मालवाहतूकही करू नये. प्रवाशांना निवडणूक प्रचार साहित्याचे वाटपही करू नये, अशी सक्त सूचना वायव्य परिवहनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रियांगा एम. यांनी केली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रोकड, सोने-चांदी आदींची बसमधून ने-आण करू नये. आवश्यक कागदपत्रांशिवाय अशा वस्तू बसमध्ये घेऊ नयेत. याबरोबरच निवडणूक प्रचार साहित्य, बॅनर आदींचीही बसमधून वाहतूक करू नये, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली असून प्रवाशांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.