कार अपघातात बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी जखमी

हलगा येथील सुवर्ण विधानसौध जवळ झालेल्या कार अपघातात बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी जखमी झाले आहेत. बैलहोंगल येथून बेळगावकडे येताना आमदारांच्या गाडीला आणखी एका कारची धडक बसली. भरधाव वेगात आलेल्या पोलो कारने आमदारांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात आमदार महांतेश कौजलागी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

कार अपघातात बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी जखमी

हलगा येथील सुवर्ण विधानसौध जवळ झालेल्या कार अपघातात बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी जखमी झाले आहेत. बैलहोंगल येथून बेळगावकडे येताना आमदारांच्या गाडीला आणखी एका कारची धडक बसली.
भरधाव वेगात आलेल्या पोलो कारने आमदारांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात आमदार महांतेश कौजलागी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.