‘नायट्रोजन पान’ खाल्ल्याने 12 वर्षीय मुलीच्या पोटात पडले मोठे छिद्र!

‘नायट्रोजन पान’ खाल्ल्याने 12 वर्षीय मुलीच्या पोटात पडले मोठे छिद्र!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Liquid Nitrogen Bengaluru : बंगळुरूमध्ये एका 12 वर्षीय मुलीला लिक्विड नायट्रोजन पान खाणे चांगलेच महागत पडले आहे. भारतात विविध प्रकारचे मसाले पान खाण्यासाठी उपलब्ध आहेत. काही लोकांना फायर पान खायला आवडते तर काहींना लिक्विड नायट्रोजन पान आवडते. पण हे लिक्विड नायट्रोजन पान खाल्ल्याने बेंगळुरूमधील शाळकरी मुलीला व्हेपरेशन पेरिटोनिटिस म्हणजेच पोटात मोठे छिद्र पडल्याचे समोर आले आहे.
स्मोकी पानचा ट्रेंड वाढत आहे. मॉल असो की ओपन मार्केट, सर्वत्र पानांच्या दुकानात स्मोकी पान विकले जात आहे लोकंही ते आवडीने खताना दिसत आहेत. पण हे पान खाल्ल्यानंतर नुकतेच एका 12 वर्षाच्या मुलीसोबत जे घडले ते ऐकून तुमचा थरकाप तर उडेलच पण ते खाण्यापासून पळ काढाल. हे पान खाल्ल्याने एका मुलीच्या पोटात छिद्र पडल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. ही घटना एप्रिल महिन्यात घडली. अनेक लोक लिक्विड नायट्रोजन पान खात असल्याचे पाहून 12 वर्षाच्या मुलीनेही उत्सुकतेपोटी हे पान खाल्ले. पण मनोरंजनासाठी खाल्लेले हे पान त्या मुलीसाठी दुःस्वप्न बनले. काही वेळाने तिला पोटात दुखू लागले. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. (Liquid Nitrogen Bengaluru)
डॉक्टरांनी मुलीच्या पोटाची तपासणी केली. स्कॅनिंगचा अहवाल धक्कादायक निघाला. या अहवालात मुलीच्या पोटात छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले, जे लिक्विड नायट्रोजन खाल्ल्याने झाले होते. मुलीच्या म्हणण्यानुसार, मी फक्त ते स्मोक्ड पान खाल्ले होते कारण ते आकर्षक दिसत होते. माझ्याशिवाय अनेकांनी त्या पानाचा आस्वाद घेतला होता. पण जर कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता तर मला एवढी मोठी अडचण का आली?’
शस्त्रक्रिया करावी लागणार (Liquid Nitrogen Bengaluru)
मुलीच्या या प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांकडेही नव्हती. मुलीला बेंगळुरू येथील खासगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. सर्जिकल टीमच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या पोटाच्या इंट्रा-ऑप ओजीडोस्कोपी आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी चाचण्या करण्यात आल्या, ज्यात तिच्या पोटात छिद्र असल्याचे उघड झाले. आता केवळ शस्त्रक्रियेच्या मदतीने मुलीला वाचवता येईल, अन्यथा तिच्या पोटातील छिद्र वाढू शकते, असा दोका त्यांनी व्यक्त केला.
लिक्विड नायट्रोजन पान म्हणजे काय?
नायट्रोजन हा एक प्रकारचा वायू आहे, ज्याचे द्रवात रूपांतर करून त्याला 20 अंश सेल्सिअस तापमानात ठेवले जाते. या द्रव नायट्रोजनची वाफ वेगाने तयार होते आणि त्यातून धूर बाहेर येऊ लागतो. हा द्रव नायट्रोजन वायू पानावर ओतला जातो. यातील रासायनिक पदार्थ फक्त त्वचेलाच नाही तर आरोग्याला देखील नुकसान करतात. द्रव नायट्रोजनच्या वाफांमुळे ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि श्वास घेण्यात अडचण येऊ शकते.

Go to Source