साथीच्या रोगांबाबत ग्रामीण भागात जागृती
विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी : परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
बेळगाव : संसर्गजन्य रोग वाढत असल्याने आरोग्य खात्याकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य खात्याकडून आवाहन करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने संसर्गजन्य रोग वाढत आहेत. गेल्या पंधरवड्यामध्ये दोन तरुणांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जागृती करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, परिचारिका व आशा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जागृती मोहीम राबविली जात आहे.
ग्रामीण भागात घरांमध्ये अनेक दिवस पाणी साठवून ठेवले जाते. यामुळे त्यामध्ये अळ्या निर्माण होऊन डासांची उत्पत्ती होते. याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती करून देऊन पाणी उघड्यावर ठेवू नये, अधिक दिवस साठवू नये, त्याची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी, तसेच आसपासच्या ठिकाणी साचणारे पावसाचे पाणी धोकादायक असून, त्याचा निचरा व्हावा, याबाबत ग्राम पंचायतींना सूचना करण्यात येत आहेत. गावांमध्ये फॉगिंग करून डास निर्मूलनासाठी औषध फवारणी करण्याची सूचनाही केली जात आहे. त्यानुसार ग्राम पंचायतींकडून फॉगिंग करण्यात येत आहे. अशा प्रकारे डेंग्यू, मलेरिया व संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
घरोघरी जाऊन जागृती मोहीम
जिल्ह्यामध्ये आरोग्य खात्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून संसर्गजन्य रोगांसंदर्भात घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. रोगाच्या लक्षणांची माहिती देऊन वेळीच उपचार घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.
– जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोनी
Home महत्वाची बातमी साथीच्या रोगांबाबत ग्रामीण भागात जागृती
साथीच्या रोगांबाबत ग्रामीण भागात जागृती
विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी : परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन बेळगाव : संसर्गजन्य रोग वाढत असल्याने आरोग्य खात्याकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य खात्याकडून आवाहन करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने संसर्गजन्य रोग वाढत आहेत. गेल्या पंधरवड्यामध्ये दोन तरुणांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. […]