मुलांना नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी टोस्ट खूप आवडतो. मल्टीग्रेन ब्रेडवर मॅश केलेला अॅव्होकॅडो, टोमॅटो आणि काकडी ठेवून एक स्वादिष्ट टोस्ट बनवता येतो. तुम्ही त्यावर चिली फ्लेक्स आणि सोया लीव्हजसुद्धा टाकू शकता. हा नाश्ता बनवायला सोपा आणि खायला स्वादिष्ट आहे. तर चला जाणून घेऊ या रेसिपी….
साहित्य-
२ स्लाइस ब्रेड (सॉर्डॉफ, मल्टीग्रेन किंवा व्हाइट)
१ मोठे पिकलेले अॅव्होकॅडो
१ चमचा लिंबाचा रस
मीठ आणि काळी मिरी (चवीनुसार)
ऑलिव्ह ऑइल (थोडेसे)
अतिरिक्त टॉपिंग्स (ऑप्शनल)
चेरी टोमॅटो स्लाइस
लाल मिरची फ्लेक्स
फेटा चीज किंवा बोईल्ड अंडी
कांदे/स्प्रिंग ऑनियन
काजू किंवा सीड्स
ALSO READ: नाश्त्यासाठी झटपट, मऊ आणि स्पंजी ‘रवा ढोकळा’ उत्तम पर्याय
कृती-
सर्वात आधी ब्रेड टोस्ट करा. ब्रेड स्लाइस टोस्टर किंवा पॅनमध्ये हलका गोल्डन ब्राउन होईपर्यंत टोस्ट करा. आता अॅव्होकॅडो अर्धे करून बिया काढा. चमच्याच्या साहाय्याने मऊ भाग बाहेर काढा. बाऊलमध्ये ठेवून फॉर्कने हलके मॅश करा. पूर्ण प्युरी करू नका थोडी टेक्सचर राहू द्या. मॅश केलेल्या अॅव्होकॅडोमध्ये लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी आणि थोडेसे ऑलिव्ह ऑइल घाला. चांगले मिसळा. गरम टोस्टवर अॅव्होकॅडो मिश्रण पसरवा. वरून तुम्हाला हवे ते टॉपिंग्स टोमॅटो, मिरची फ्लेक्स, चीज इ. टाका. तर चला तयार आहे अॅव्होकॅडो टोस्ट रेसिपी, मुलांना नक्कीच सर्व्ह करा. तसेच हा पदार्थ बनवतांना अॅव्होकॅडो पूर्ण पिकलेले असावे. लिंबाचा रस घातल्याने रंग काळा पडत नाही आणि चव चांगली येते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Chocolate Shrikhand मुलांना आवडेल असे चॉकलेट श्रीखंड – एकदा ट्राय केल्यावर वारंवार मागतील