सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नामिबियावर दणदणीत विजय
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा : डेव्हिड वॉर्नरचे 20 चेंडूत अर्धशतक : झाम्पाचे 3 तर हॅजलवूडचे 2 बळी
वृत्तसंस्था /पोर्ट ऑफ स्पेन
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला दोन दिवसाचा कालावधी बाकी आहे. स्पर्धेआधी सराव सामने सुरु असून बुधवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 20 षटकांत 9 बाद 119 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अवघ्या 10 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. डेव्हिड वॉर्नरने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करताना अवघ्या 21 चेंडूत 54 धावा ठोकल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दुसरा सराव सामना आज वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या नामिबियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मायकेल लिंगनला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर जोश हॅजलवूडने त्याला बाद केले. यानंतर निकोल्स डेविन (14), जेपी कोट्जे (13), फ्रायलिंक (1), गेहार्ड इरॅस्मस (15), जेजे स्मिट (1) हे टॉप ऑर्डरचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्याने नामिबियाची 7 बाद 75 अशी स्थिती झाली होती. आठव्या स्थानावर फलंदाजीला मैदानात आलेल्या जेन ग्रीनने 30 चेंडूत 5 चौकारासह 38 धावांची खेळी खेळलीआणि नामिबियाला कसेबसे 100 धावांच्या पार पोहोचवले. त्याला मालन व्रुगरने 18 धावा करत चांगली साथ दिली. यामुळे नामिबियाला 9 बाद 119 धावा करता आल्या. कांगारुकडून अॅडम झाम्पाने 3 तर जोश हॅजलवूडने 2 गडी बाद केले.
अवघ्या 10 षटकांत 123 धावा
ऑस्ट्रेलियासाठी 120 धावांचे खूप किरकोळ आव्हान होते. ऑस्ट्रेलियासाठी सलामीला आलेल्या मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श 18 धावावर रनआऊट झाला. यानंतर लगेच जोस इंग्लिस 5 धावा काढून तंबूत परतला. यानंतर टिम डेविड आणि डेविड वॉर्नर यांनी संघाला 10 व्या षटकातच दणकेबाज विजय मिळवून दिला. वॉर्नरने 21 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह नाबाद 54 धावा केल्या तर डेविडने 23 धावा करत त्याला चांगली साथ दिली. मॅथ्यू वेड 12 धावांवर नाबाद राहिला. नामिबियाकडून बर्नाडने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
नामिबिया 20 षटकांत 9 बाद 119 (निकोल्स डेविन 14, गेहार्ड इरॅस्मस 15, झेन ग्रीन 38, व्रुगर 18, झाम्पा 25 धावांत 3 बळी, हॅजलवूड 5 धावांत 2 बळी), ऑस्ट्रेलिया 10 षटकांत 3 बाद 123 (मिचेल मार्श 18, डेव्हिड वॉर्नर 21 चेंडूत नाबाद 54, टीम डेविड 23, वेड नाबाद 12, बर्नार्ड 16 धावांत 2 बळी).
बांगलादेश-अमेरिका सामना रद्द
टी-20 वर्ल्डकपमधील डलास येथे होणारा बांगलादेश व अमेरिका यांच्यातील सामना खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. आयसीसीकडून ही माहिती देण्यात आली.
Home महत्वाची बातमी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नामिबियावर दणदणीत विजय
सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नामिबियावर दणदणीत विजय
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा : डेव्हिड वॉर्नरचे 20 चेंडूत अर्धशतक : झाम्पाचे 3 तर हॅजलवूडचे 2 बळी वृत्तसंस्था /पोर्ट ऑफ स्पेन आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला दोन दिवसाचा कालावधी बाकी आहे. स्पर्धेआधी सराव सामने सुरु असून बुधवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 20 षटकांत 9 बाद 119 धावा […]