20 खनिज खाणींचा जूनपर्यंत होणार लिलाव

खाण सचिव व्ही.एल.कांता राव यांची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सरकार जून अखेरीस लिलावाच्या चौथ्या फेरीत सुमारे 20 महत्त्वपूर्ण खनिज ब्लॉक्सची विक्री करणार आहे. यासोबतच ऑफशोअर मायनिंगसाठीचा पहिला लिलाव पुढील तीन महिन्यांत होणार आहे असे खाण सचिव व्ही. एल. कांता राव  राव यांनी सांगितले आहे. राव यांनी महत्त्वाच्या खनिज परिषदेत सांगितले की, ‘आम्ही पुढील लिलाव जूनच्या […]

20 खनिज खाणींचा जूनपर्यंत होणार लिलाव

खाण सचिव व्ही.एल.कांता राव यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकार जून अखेरीस लिलावाच्या चौथ्या फेरीत सुमारे 20 महत्त्वपूर्ण खनिज ब्लॉक्सची विक्री करणार आहे. यासोबतच ऑफशोअर मायनिंगसाठीचा पहिला लिलाव पुढील तीन महिन्यांत होणार आहे असे खाण सचिव व्ही. एल. कांता राव  राव यांनी सांगितले आहे.
राव यांनी महत्त्वाच्या खनिज परिषदेत सांगितले की, ‘आम्ही पुढील लिलाव जूनच्या अखेरीस आणू. अशा प्रकारे ही लिलाव प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र, येत्या तीन महिन्यांत ऑफशोअर मायनिंगचा लिलाव होणार आहे. पहिल्या फेरीत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सात महत्त्वाच्या खनिज गटांची लिलाव प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याचेही राव यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत केंद्राने 38 महत्त्वाच्या आणि धोरणात्मक खनिजांचा लिलाव सुरू केला आहे. तांबे, लिथियम, निकेल, कोबाल्ट यांसारखी खनिजे आणि दुर्मिळ घटक हे आज वेगाने वाढणाऱ्या अनेक स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये विंड टर्बाइन आणि पॉवर नेटवर्कपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतच्या क्षेत्रात महत्त्वाचे असे आवश्यक घटक ठरलेले आहेत. राव म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत अनेक महत्त्वाचे ब्लॉक्स सापडले आहेत. परिणामी 100 हून अधिक महत्त्वाचे खनिज गट लिलावासाठी विचारात आहेत.