Ashok Saraf: अशोक सराफ यांचा अनोखा लूक, ‘लाईफलाईन’ सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
Ashok Saraf upcoming movie: अभिनेते अशोक सराफ यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असतो. आता एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या या चित्रपटाचे नाव ‘लाईफलाईन’ असे आहे.