विजयाचा उन्माद आणि बेधुंदी..! ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे संतापजनक वर्तन
पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव केला. यानंतर आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्श दोन्ही पाय विश्वचषक ट्रॉफीवर ठेवून बसलेला दिसत आहे. हा फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो फोटो प्रचंड व्हायरल होतोय. त्यावरून ऑस्ट्रेलियन संघाला ट्रोल केले जात आहे.
2023 क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून सहावे विजेतेपद पटकावले. अहमदाबादमध्ये हा सामना झाला, जिथे ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकांच्या बळावर भारताला २४० धावा करता आल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने उल्लेखनीय खेळी करत 120 चेंडूत 137 धावा करत आपल्या संघाला विजयाकडे नेले. ऑस्ट्रेलियाने ४२ चेंडू बाकी असताना सहा विकेट्स राखून आरामात विजय मिळवला.
The post विजयाचा उन्माद आणि बेधुंदी..! ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे संतापजनक वर्तन appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव केला. यानंतर आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्श दोन्ही पाय विश्वचषक ट्रॉफीवर ठेवून बसलेला दिसत आहे. हा फोटो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर …
The post विजयाचा उन्माद आणि बेधुंदी..! ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे संतापजनक वर्तन appeared first on पुढारी.