ज्ञान देणारे नसतील तर ऐश्वर्य आणि वैभव निरुपयोगी : पंडित प्रदीप मिश्रा

धुळे : पुढारी वृत्तसेवा-रावणाकडे ऐश्वर्य, वैभव आणि शक्ती होती. मात्र त्याच्याकडे ज्ञान देणारे कोणीही नसल्यामुळे त्याचा विध्वंस झाला. जीवनात ज्या व्यक्तीकडे ज्ञान देणारे चांगले व्यक्ती असतात, ते गरीब असूनही करोडपती असतात. ज्यांच्याकडे ज्ञान देणारे नाही. ते खरे कंगाल आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान देणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व फार मोठे आहे. असे विचार आज पंडित प्रदीप मिश्रा … The post ज्ञान देणारे नसतील तर ऐश्वर्य आणि वैभव निरुपयोगी : पंडित प्रदीप मिश्रा appeared first on पुढारी.

ज्ञान देणारे नसतील तर ऐश्वर्य आणि वैभव निरुपयोगी : पंडित प्रदीप मिश्रा

धुळे : पुढारी वृत्तसेवा-रावणाकडे ऐश्वर्य, वैभव आणि शक्ती होती. मात्र त्याच्याकडे ज्ञान देणारे कोणीही नसल्यामुळे त्याचा विध्वंस झाला. जीवनात ज्या व्यक्तीकडे ज्ञान देणारे चांगले व्यक्ती असतात, ते गरीब असूनही करोडपती असतात. ज्यांच्याकडे ज्ञान देणारे नाही. ते खरे कंगाल आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान देणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व फार मोठे आहे. असे विचार आज पंडित प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केले.
धुळे येथील शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालयाजवळ सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेचा समारोप झाला. या समारोपप्रसंगी लाखो भाविकांचा महापूर उसळला. आज कथेची सुरुवात सकाळी आठ वाजेला झाली. मात्र रात्रीपासूनच लाखो भाविक कथेच्या तंबूमध्ये मुक्कामी थांबले होते. तर रात्रभर भजन आणि कीर्तनामुळे हा परिसर भक्तीमय झाला. या भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमात अविष्कार भुसे ,अनुप अग्रवाल, बाळासाहेब भदाणे, चेतन मंडोरे यांच्यासह लाखो भाविक तल्लीन झाले. सकाळी चार वाजेपासूनच धुळे शहरातील भाविकांची कथास्थळी जाण्यासाठी रीघ लागली. त्यामुळे कथास्थळी मंडपाच्या बाहेर देखील लाखो भाविकांनी हजेरी लावून या कथेचा लाभ घेतला.
यावेळी कथेचे निरूपण करताना पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले की, शिव कथेच्या आयोजनाची तयारी करण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतात. मात्र धुळ्याच्या आयोजकांनी अवघ्या दहा दिवसात लाखो भाविकांची व्यवस्था केली. ही बाब शिव कृपेनेच शक्य झाली आहे. सनातन धर्मावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी धुळेकरांनी जागरूक रहावे. हा या कथेचा हेतू आहे. तुमच्या मधील भक्ती जागरूक होईल. तेवढे शिव तुमच्या जवळ येईल. प्रत्येकाकडे चांगले आणि वाईट पाहण्याची दृष्टी आहे. मात्र आपण चांगलेच पाहिले पाहिजे. सध्या समाजामध्ये अवगुणांवर जास्त बोलले जाते. मात्र आपण वाईट न पाहता चांगल्या गुणांवर चर्चा केली पाहिजे. गुलाबासोबत काटे देखील असतात. मात्र आपण केवळ गुलाबाची फुले घेतो. काटे घेत नाहीत. गुलाबाबरोबर थोडेफार काटे देखील येतात. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया आली, तर प्रत्येक जण त्याबाबत वाईट मत तातडीने व्यक्त करतो. ही बाब योग्य नसल्याचे देखील पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्त बनून गेले पाहिजे. अंगावर दागिने घालून जाणे योग्य नाही. भगवान शिव हे तर अडबंग आहेत. त्यांच्या अंगावर रुद्राक्ष आणि भस्म या व्यतिरिक्त काहीही नाही. शिवभक्तांनी देखील ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कथेचे आयोजक असणारे बाळासाहेब भदाणे हे धुळ्याच्या ग्रामीण भागात करत असलेल्या कामांचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथेत कौतुक केले. बाळासाहेब भदाणे हे ग्रामीण जनतेचे आरोग्य आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. यासाठी अहोरात्र त्यांचे त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मदतीने होणारे प्रयत्न हे स्तुतियोग्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी सभेत त्यांनी दिली. त्याला लाखो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
आयोजक मंत्री भुसे, अनुप अग्रवाल, खासदार भामरे भाविकांसमोर नतमस्तक
कथेचा समारोप झाल्यानंतर आयोजक अनुप अग्रवाल यांनी व्यासपीठावरून प्रतिक्रिया व्यक्त करताना भाविकांची गैरसोय झाली असल्यास क्षमा मागितली. या कथेच्या आयोजनासाठी हजारो हात राबले. यात त्यांनी आयोजक असणारे मंत्री दादा भुसे, खासदार डॉक्टर सुभाष भामरे ,बाळासाहेब भदाणे, चेतन मंडोरे यांच्यासह कथेसाठी  नगरसेवक भिकन वराडे, माजी महापौर जयश्री अहिरराव, गजेंद्र अंपळकर ,सतीश महाले ,मनोज मोरे, कैलास चौधरी, यांच्यासह प्रत्येकाचे आभार मानले. या कथेसाठी आलेल्या लाखो भाविकांना दररोज भंडाऱ्यामध्ये अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी मदत केली. तरीही भाविकांची गैरसोय झाली असल्यास आपण नतमस्तक होऊन माफी मागतो, असे मत व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडात झाला.
त्यानंतर बोलताना खासदार डॉक्टर भामरे यांनी देखील धुळेकरांचे मन या कथेमुळे भक्तिमय झाले आहे. कथेच्या आयोजनासाठी मोठी धावपळ करावी लागली. मात्र यासाठी हजारो स्वयंसेवकांची मदत झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
तर मंत्री दादा भुसे यांनी धुळेकर हे भाग्यवान असल्याचे सांगितले. शिव कथेची वेळ मिळण्यासाठी दोन वर्ष तरी वाट पाहावी लागते .मात्र धुळेकरांना ही कथा मिळाली. ही भाग्याची गोष्ट आहे. या संधीचे धुळेकरांनी सोने केले आहे. धुळ्यात या कथेच्या माध्यमातून महाकुंभ झाले असून त्याला ज्ञात अज्ञातांची मदत झाली. त्यामुळे भाविकांसाठी त्रुटी राहिली असेल तर आपण देखील नतमस्तक होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पाच दिवसांमध्ये केलेल्या भक्तीची अनुभूती प्रत्येक भाविकाला दिसेल. आगामी काळात हीच कथा होईल. त्यावेळी ही अनुभूती भक्तच सांगतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी उपस्थित लाखो भाविकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच गावातील मंदिर परिसराची स्वच्छता करून त्याचे पावित्र्य राखण्याचे आवाहन देखील केले.
The post ज्ञान देणारे नसतील तर ऐश्वर्य आणि वैभव निरुपयोगी : पंडित प्रदीप मिश्रा appeared first on पुढारी.

धुळे : पुढारी वृत्तसेवा-रावणाकडे ऐश्वर्य, वैभव आणि शक्ती होती. मात्र त्याच्याकडे ज्ञान देणारे कोणीही नसल्यामुळे त्याचा विध्वंस झाला. जीवनात ज्या व्यक्तीकडे ज्ञान देणारे चांगले व्यक्ती असतात, ते गरीब असूनही करोडपती असतात. ज्यांच्याकडे ज्ञान देणारे नाही. ते खरे कंगाल आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान देणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व फार मोठे आहे. असे विचार आज पंडित प्रदीप मिश्रा …

The post ज्ञान देणारे नसतील तर ऐश्वर्य आणि वैभव निरुपयोगी : पंडित प्रदीप मिश्रा appeared first on पुढारी.

Go to Source