Market News : लसूण, काकडी महागली; फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त

पुणे : थंडीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात काकडीची आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने काकडीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये लसणाची आवक कमी होत असल्याने पुण्यातील बाजारपेठेत लसणाची आवक मंदावली आहे. परिणामी, लसणाचे भावही दहा टक्क्यांनी वधारले … The post Market News : लसूण, काकडी महागली; फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त appeared first on पुढारी.

Market News : लसूण, काकडी महागली; फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त

शंकर कवडे

पुणे : थंडीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात काकडीची आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने काकडीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये लसणाची आवक कमी होत असल्याने पुण्यातील बाजारपेठेत लसणाची आवक मंदावली आहे. परिणामी, लसणाचे भावही दहा टक्क्यांनी वधारले आहेत.
संबंधित बातम्या :

येरवड्यात छटपूजा उत्साहात ; उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी
Worldcupfinal2023 : भारताच्या पराभवावर बाबर आझमसह पाकिस्तानचे क्रिकेपटू काय म्हणाले?
Nashik News : राज्यपाल बैस उद्या नाशकात, शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

ढगाळ वातावरणामुळे कोबी, फ्लॉवर व वांगीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने या फळभाज्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. बाजारातही मोठ्या प्रमाणात या फळभाज्या दाखल होत आहे. बाजारात येत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने कोबी, फ्लॉवर व वांगीच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे गत आठवड्यातील भाव टिकून आहे. गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. 19) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 2 ते 3 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 5 ते 6 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, भुईमुग शेंग गुजरात व कर्नाटक येथून प्रत्येकी 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून 13 ते 14 टेम्पो व पंजाब येथून 1 ट्रक मटार, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 5 ते 6 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे अकरा ते बारा हजार क्रेट्स, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा जूना सुमारे 50 ते 60 ट्रक, नवीन 25 ते 30 ट्रक इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 35 ते 40 टेम्पो आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
मुळा, चुका गड्डीमागे पाच रुपयांनी महाग
तरकारी विभागात पालेभाज्यांचे कमी झालेले दर या आठवड्यात टिकून राहिले. रविवारी (दि. 19) कोथिंबिरीची तब्बल 2 लाख जुडी, तर मेथीची 1 लाख 25 हजार जुडी इतकी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक टिकून राहिली. बाजारात दाखल झालेल्या पालेभाज्यांच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने चुका व मुळा या पालेभाज्यांच्या गड्डीमागे पाच रुपयांनी वाढ झाली. घाऊक बाजारात पालेभाजीच्या एका जुडीला 3 ते 12 रुपये दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात 5 ते 40 रुपये गड्डी या दराने पालेभाज्यांची विक्री झाली.
The post Market News : लसूण, काकडी महागली; फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त appeared first on पुढारी.

पुणे : थंडीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात काकडीची आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने काकडीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये लसणाची आवक कमी होत असल्याने पुण्यातील बाजारपेठेत लसणाची आवक मंदावली आहे. परिणामी, लसणाचे भावही दहा टक्क्यांनी वधारले …

The post Market News : लसूण, काकडी महागली; फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त appeared first on पुढारी.

Go to Source