प्रकाश आंबेडकर यांची एकनाथ शिंदे यांना ऑफर, म्हणाले…

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे. त्यांनी भाजप सोडावं आणि आमच्या सोबत यावं, अशी ऑफर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रीय नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. वाशिम येथे आज (दि.३०) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आमच्या … The post प्रकाश आंबेडकर यांची एकनाथ शिंदे यांना ऑफर, म्हणाले… appeared first on पुढारी.

प्रकाश आंबेडकर यांची एकनाथ शिंदे यांना ऑफर, म्हणाले…

वाशिम: Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे. त्यांनी भाजप सोडावं आणि आमच्या सोबत यावं, अशी ऑफर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रीय नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. वाशिम येथे आज (दि.३०) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ठरवावं सोबत यायचं की नाही, असेही ते म्हणाले.
लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र, या बैठकीला मी उपस्थित राहणार नाही. तर वंचितचे प्रा. धैर्यवान फुंडकर उपस्थित राहणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर, अरुंधती सिरसाट, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे, जिल्हाध्यक्ष किरनताई गिऱ्हे, डॉ. वैशालीताई देवळे, ज्योतीताई इंगळे, इरफान कुरेशी आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी, जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा 

वाशिम: कारसाठी पैसे न दिल्याने नवविवाहितेचा गळा चिरून खून; पतीचाही जीवन संपविण्याचा प्रयत्न
वाशिम : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, एक जखमी
वाशिममध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

Latest Marathi News प्रकाश आंबेडकर यांची एकनाथ शिंदे यांना ऑफर, म्हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.